Shivsena News : एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिपदावर नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी, 'त्या' नेत्यांना मिळणार डच्चू ?

Maharashtra government cabinet reshuffle News : दोन दिवसापूर्वीच शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत शिंदे यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राज्यातील महायुती सरकारला सत्तेत येऊन पुढील महिन्यात सत्तेत येऊन दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. त्याच वेळी शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना चांगली कामगिरी करण्याचा सल्ला देत अडीच वर्षानंतर अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांना वगळून त्यांच्या जागी तरुण आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याशिवाय काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी देऊन पदोन्नती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दोन दिवसापूर्वीच शिवसेनेच्या (Shivsena) मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत शिंदे यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना कामकाजात सुधारणा करण्याची तंबी दिली होती. जनतेची कामे, मतदारसंघातील प्रश्न आणि पक्षसंघटनेच्या वाढीकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले होते. यापूर्वीही कामगिरी सुधारली नाही तर मंत्रिपद गमवावं लागू शकते, असा इशारा शिंदेंनी दिला होता.

दोन वर्षांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना पूर्वी त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत या मंत्र्यांना वगळले होते. त्यामुळे येत्या काळात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारावेळी मंत्रिमंडळातील कोणाला नारळ देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde
MLC Election : विधानपरिषदेच्या तोंडावर शरद पवारांचा मोठा डाव; ठाकरेंची शिवसेना एकाकी; काँग्रेसच्या निर्णयाने तापले राजकीय वातावरण!

राज्यमंत्री मंडळातील संजय शिरसाट, संजय राठोड, दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्या कामगिरीवर एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे नाराज असल्याचे समजते. त्यामुळे विस्तारावेळी राज्यमंत्री असलेले योगेश कदम, आशिष जयस्वाल या दोघांना राज्यमंत्रिपदावरून थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर काही तरुण आमदारांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या शिवसेनेतील संघटनात्मक बदलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde
ShivsenaUBT News: निवडणुकीच्या तोंडावरच एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना 'दे धक्का'; जवळचाच नेता फोडला, ठाण्यात धनुष्यबाण घेतला हाती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com