Thane News: राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांच्या निवडणुकांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.या निवडणुकीच्या तोंडावरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आमदार आदित्य ठाकरेंच्या अगदी जवळचा नेता फोडला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांनी शुक्रवारी (ता.16 ऑक्टोबर) एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा दुबेंनी धनुष्यबाण हाती घेतला आहे.
काही दिवसांपूर्वीच सध्याची उद्धव ठाकरे गटाची सध्याची विचारधारा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मतभेद असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळेच त्यांनी आपली राजकीय दिशा बदलण्याचा निर्णय घेतला होता. आनंद दुबे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता.
आनंद दुबे हे आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. दुबे यांनी शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आणि पक्षाच्या आव्हानात्मक काळात चार-पाच वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवर जोरदार किल्ला लढवताना दिसून आले होते.
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक आणि मुद्देसूद भूमिका मांडताना स्वत:ची ओळख उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा आक्रमक चेहरा बनले होते. मुंबईच्या राजकारणातील पक्षाचा प्रमुख हिंदी भाषिक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
आनंद दुबे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्यामागचं कारणही स्पष्ट केलं होतं. हिंदुत्व आणि सनातन धर्माच्या मुद्द्यावरून पक्षाशी वैचारिक मतभेद असल्याचं दावा त्यांनी केला होता. तसेच ठाकरे गटाची सध्याची विचारधारा आणि सार्वजनिक विधानांशी जुळवून घेणं कठीण जात असल्यानंच आपण हा निर्णय घेतल्याचं दुबे यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.