Shambhuraj Desai : शिवसेनेकडील वजनदार खाते राष्ट्रवादीकडे, शंभुराज देसाई म्हणाले, 'एकनाथ शिंदेसाहेब...'

Shambhuraj Desai Statement on Cabinet Portfolio : राज्यामध्ये पर्यटन खाते देखील खूप महत्त्वाचे आहे. लोक आता टुरिझमकडे वळायला लागले आहेत. टुरिझमच्या माध्यमातून अर्थव्यवस्था वाढली आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले.
Shambhuraj Desai  Eknath Shinde Ajit Pawar
Shambhuraj Desai Eknath Shinde Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात शंभूराज देसाई यांच्याकडे असलेले उत्पादन शुल्क खाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे. तर, फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शंभूराज देसाई यांना पर्यटन खाते मिळाले आहे. शिवसेनेकडील महत्त्वाचे खाते राष्ट्रवादीकडे गेल्याची त्यामुळे चर्चा आहे. यावर देसाई यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

'कुठलेही खाते मोठे आणि लहान नसते. शिवसेनेच्या खात्यातील उत्पादन शुल्क खाते राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले आहे. पण गृहनिर्माण खाते एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे आले आहे. सर्वच खाती तोलामोलाची आहेत.', असे शंभूराज देसाई म्हणाले.

Shambhuraj Desai  Eknath Shinde Ajit Pawar
Manikrao Kokate : मंत्री कोकाटे यांनी थेट सुनावले; भुजबळांना पोटदुखी का?

'राज्यामध्ये पर्यटन खाते देखील खूप महत्त्वाचे आहे. लोक आता टुरिझमकडे वळायला लागले आहेत. टुरिझमच्या माध्यमातून अर्थव्यवस्था वाढली आहे. चांगलं काम करायचे आहे, हे शिंदेसाहेबांनी मला सांगितले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरेसा निधी तुमच्या विभागाला दिला जाईल, असे सांगितले आहे.', अशी माहितीही देसाई यांनी दिली.

दोन दिवसांत पालकमंत्री ठरणार

देसाई यांनी सांगितले 'आम्ही निवडून आल्या आल्या सर्व अधिकार एकनाथ शिंदेसाहेब यांना दिले. आमच्या संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. एक-दोन दिवसात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची बैठक होईल आणि पालकमंत्री ठरवण्याच्या संदर्भात ते निर्णय घेतील. आमच्या तीनही पक्षात मंत्रिपदावरून कोणतीही रस्सीखेच नव्हती. तसेच पालकमंत्री पदावरून आमच्या कोणतीही रस्सीखेच नाही'

ठाण्याचे पालकमंत्रिपद कोणाला?

'प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे. पण याचा सर्वस्वी निर्णय आमचे नेते घेतील. आम्ही पक्ष शिस्त पाळणारे आहोत. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व मंत्री त्यांना जो विभाग मिळाला त्यामध्ये ते चांगलं काम करून दाखवतील. हातात हात घालून आम्ही चांगले काम करू, असे देसाई यांनी सांगितले. तसेच ठाण्याच्या पालकमंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले, पालकमंत्रिपदाची अधिकृत नावे येईपर्यंत कोणीही दावा करू शकत. पण याचा अंतिम निर्णय तिघेजण मिळून घेणार आहेत.

Shambhuraj Desai  Eknath Shinde Ajit Pawar
Cabinet Ministers : 'या' खात्यांसाठी होती रस्सीखेच; कुणाच्या गळ्यात पडली कॅबिनेट मंत्रिपदाची माळ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com