Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

Chandrashekhar Bawankule : तिकीट कापलं तरी संयम ठेवला! खातेवाटपात चंद्रशेखर बावनकुळेंना मिळालं मोठं बक्षीस

Cabinet portfolio distribution Chandrashekhar Bawankule revenue Ministry : 2014 मध्ये फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना 2019 च्या निवडणूक तिकीट नाकारण्यात आले होते.
Published on

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा खातेवाटप जाहीर केले आहे. गृहखातं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवले आहे तर, अर्थखातं अजित पवारांकडे आहे. तर, गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहे. खातेवाटपात भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नंबर दोनचे महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालेले महसूल खाते म्हणजे त्यांच्या संयमाचेच पक्षाने त्यांना दिलेले बक्षीस आहे. कारण 2014 मध्ये फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या त्यांना 2019 च्या निवडणूक तिकीट नाकारण्यात आले. पक्षाचा आदेश मानून बावनकुळे यांनी तो निर्णय स्वीकारत पक्षाचे काम केले. पक्षाने त्यांना 2022 मध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.

Chandrashekhar Bawankule
Maharashtra Cabinet portfolio allocation : दादा, शिंदे यांच्या मंत्रालयांवर फडणवीसांचा असाही 'वॉच'?

बावनकुळे यांचे विधान परिषदेत पुनर्वसन करण्यात आले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा बावनकुळे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना कामठीमधून उमेदवारी देण्यात आली.विधान परिषदेचा चार वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना देखील बावनकुळे निवडणुकीच्या मैदानात उतरले.

लोकसभेच्या निवडणुकीत कामठी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला तब्बल 17 हजार मते कमी पडली होती. त्यामुळे ही निवडणुकी बावनकुळे यांना जड जाईल अशी शक्यता होती. मात्र, बावनकुळेंनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

भाजपचा ओबीसी चेहरा

मंत्रिमंडळात भाजपकडे असलेल्या खात्यांमध्ये गृहखात्यानंतर महसूल हे दुसरे मोठे खाते भाजपकडे आहे. ते खाते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देत भाजपमध्ये त्यांना क्रमांक नंबर दोनचा असेल असे संकेत देण्यात आले आहेत. भाजपचा मुख्य मतदार हा ओबीसी आहे. त्यामुळे बावनकुळे हे मंत्रिमंडळातील प्रमुख ओबीसी चेहरा असतील असे चित्र आहे.

Chandrashekhar Bawankule
Maharashtra Cabinet portfolio distribution: राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला मुहूर्त लागला; देवेंद्र फडणवीसांनी गृह सोडलेच नाही; शिंदेंकडे....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com