Maharashtra Drought : सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आणखी 6 तालुके दुष्काळाच्या यादीत; कर्जापासून वीजबिलापर्यंत सवलती

Maharashtra declares 6 drought-hit talukas : दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जमीन महसुलात सूट देण्यात येणार आहे. पीककर्जाचे पुनर्गठन करण्याबरोबरच शेतीशी संबंधित कर्जांच्या वसुलीलाही स्थगिती दिली जाणार आहे. कृषिपंपांच्या चालू वीजबिलात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Drought | 6 New Talukas | Farmer Relief
Maharashtra Drought | 6 New Talukas | Farmer ReliefSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Drought News : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने आणखी सहा तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या 304 तालुक्यांमध्ये आता सहा तालुक्यांची नव्याने भर पडली आहे. नाशिक, पालघर, रत्नागिरी आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांतील संबंधित तालुक्यांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे. यामध्ये जमीन महसुलातील सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, वीजबिलात सवलत आणि विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.

कोणते तालुके दुष्काळग्रस्त?

शासनाच्या नव्या निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पालघर जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिंग्लज या तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आणि नागरिकांना दुष्काळ निवारणासाठी जाहीर केलेल्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे.

शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी कोणत्या सवलती?

दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जमीन महसुलात सूट देण्यात येणार आहे. पीककर्जाचे पुनर्गठन करण्याबरोबरच शेतीशी संबंधित कर्जांच्या वसुलीलाही स्थगिती दिली जाणार आहे. कृषिपंपांच्या चालू वीजबिलात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट (7.5 हॉर्सपावर पर्यंत क्षमतेच्या विजपंपाचे वीज बिल अगोदरच माफ करण्यात आले आहे. त्यावरील वीज पंपांना सदर सूट लागू असेल.)

Maharashtra Drought | 6 New Talukas | Farmer Relief
Pune Job Fraud : पुणे महापालिकेचा शिक्का अन् बनावट नियुक्तीपत्र; सरकारी नोकरीच्या नावाखाली तरुणांची तब्बल 1.37 कोटींची फसवणूक!

दुष्काळाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ नये, यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे अधिक प्रमाणात उपलब्ध व्हावीत, यासाठी कामांचे निकष शिथिल करून जास्तीत जास्त कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन

दुष्काळी भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गरजेनुसार टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. टंचाई जाहीर केलेल्या गावांमधील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी खंडित केली जाणार नाही. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना अन्नधान्याची कमतरता भासू नये, यासाठीही आवश्यक व्यवस्था केली जाणार आहे.

Maharashtra Drought | 6 New Talukas | Farmer Relief
Solapur Cader Election : माजी संचालकांच्या ‘कॅडर’च्या वाटेतही कलम 88 चा स्पीड ब्रेकर; 16 जागांसाठी 109 अर्ज दाखल, छाननीकडे लक्ष

जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यापूर्वी शासनाने जारी केलेल्या निर्देशांनुसार पिण्याच्या पाण्याचे आणि पशुधनासाठी आवश्यक पाण्याचे नियोजनही केले जाणार आहे. तसेच दुष्काळाचा सामना करणाऱ्या भागांमध्ये पिण्याचे पाणी, शेती, चारा आणि रोजगाराचे प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी सरकारकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.