Pune Job Fraud : पुणे महापालिकेचा शिक्का अन् बनावट नियुक्तीपत्र; सरकारी नोकरीच्या नावाखाली तरुणांची तब्बल 1.37 कोटींची फसवणूक!

Fake PMC Appointment Letters : पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत एका भामट्याने बेरोजगार तरुणांकडून तब्बल एक कोटी ३७ लाख ४४ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
Pune Job Fraud | Fake PMC Appointment Letters
Pune Job Fraud | Fake PMC Appointment LettersSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News, 20 Nov : पुण्यात बेरोजगार तरुणांची फसवणूक करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.

अशातच पुणे महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत एका भामट्याने बेरोजगार तरुणांकडून तब्बल एक कोटी ३७ लाख ४४ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने पुणे महापालिकेत आपली ओळख असल्याचे सांगितले.

तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध असल्याचा बनाव करून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महापालिकेचे शिक्के वापरून अधिकृत असल्याचे भासणाऱ्या लेटरपॅडवर बनावट नियुक्तीपत्रे तयार केली आणि ती बेरोजगार तरुणांना दिली.

Pune Job Fraud | Fake PMC Appointment Letters
ZP Teacher Transfer : जिल्हा परिषद शिक्षकांना मोठा धक्का! बदली नको म्हणून अपील करणाऱ्यांना दणका; ग्रामविकास विभागाचा नवा आदेश जारी

नियुक्तीपत्रे पाहून तरुणांचाही आरोपीवर विश्वास बसला. सरकारी नोकरी मिळणार या आशेने त्यांनी आरोपीकडे पैशांची व्यवस्था केली. या प्रकरणात फिर्यादीकडून नऊ लाख ३३ हजार ६०० रुपये, तर इतर साक्षीदारांकडून एक कोटी २८ लाख १० हजार ४०० रुपये घेण्यात आले. अशा प्रकारे एकूण एक कोटी ३७ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

Pune Job Fraud | Fake PMC Appointment Letters
Solapur Cader Election : माजी संचालकांच्या ‘कॅडर’च्या वाटेतही कलम 88 चा स्पीड ब्रेकर; 16 जागांसाठी 109 अर्ज दाखल, छाननीकडे लक्ष

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार एका व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट नियुक्तीपत्रे देऊन एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.