Eknath shinde Shivsena News : राज्याच्या राजकारणात 500 कोटींच्या व्हायरल क्लिपवरून आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्री अन् नेत्यांसाठी काढले महत्त्वाचे आदेश

Manoj Jarange viral audio clip controversy News : गेल्या दोन दिवसापासून एकमेकांवर टीका केली जात असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार व नेतेमंडळींना मोठे आदेश दिले.
eknath shinde
eknath shinde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी भर पत्रकार परिषदेतच ऑडिओ क्लिपचा बॉम्ब फोडला. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या ऑडिओ बॉम्बनंतर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या दोन दिवसापासून एकमेकांवर टीका केली जात असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार व नेतेमंडळींना मोठे आदेश दिले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार व नेतेमंडळींना या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करावी. त्यांना काय मदत लागणार आहे. याची माहिती द्यावी, त्या पद्धतीने मदत पाठवण्याचे नियोजन केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

येत्या काळात शिवसेनेचे (Shivsena) मंत्री, आमदार, खासदार व नेतेमंडळींना आरोप-प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवाच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत. शिंदे यांनी दिलेल्या या आदेशानंतर आता गेल्या दोन दिवसापासून एकमेकांवर केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

eknath shinde
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

रामदास कदम एकाकी पडल्याचे चित्र

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शनिवारी सकाळीच माजी मंत्री रामदास कदम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असल्याचे समजते. यावेळी कदम यांना देखील व्हायरल झालेल्या 500 कोटी रुपयांच्या आरोपाबाबत प्रसार माध्यमाशी बोलू नका असा सल्ला त्यांनी दिला असल्याचे समजते. गेल्या दोन दिवसात शिवसेनेकडून रामदास कदम यांनी एकट्यानेच बाजू लावून धरली आहे. त्यांच्याकडून दुसरा कोणीच बोलत नसल्याने ते एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळेच शनिवारी दिवसभरात रामदास कदम हे प्रसार माध्यमाशी बोलले नाहीत.

eknath shinde
SET Exam Date 2026 : सेट परीक्षेची तारीख अखेर जाहीर! 'या' दिवशी होणार परीक्षा, जाणून घ्या सविस्तर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com