यंदाच्या दिवाळीत खरेदीचे नियोजन करताना, ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. मुंबईसह राज्यभरात अन्नधान्य, कडधाने, डाळी, साखर, खाद्यतेलांसह अन्न जिन्नसांच्या किमतीत नजीकच्या कालावधीत मोठी दरवाढ झाली आहे. हवामानातील अनिश्चितता, जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय, कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ आणि सणासुदीनिमित्त वाढलेल्या मागणीमुळे विविध वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर मोठा आर्थिक ताण पडत आहे.