

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
30 जूनपर्यंत कर्जमाफीची मुदत दिली असली तरी त्याआधीच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
2 लाखांपर्यंत कर्जमाफी होण्याचा दावा करण्यात आला आहे.
Farmer Loan Waiver Maharashtra Updates : राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने अर्थसंकल्पी अधिवेशनात घेतला आहे. पण ती कधी मिळणार यावरून संभ्रम होता. जो कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी याआधीच दूर करत घोषणा केली होती. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी होईल, अशी घोषणा केली आहे. अशीच घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केली आहे. यामुळे गेल्या अनेक महिन्या पासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
एकीकडे कर्जमाफी कधी मिळणार याकडे राज्यातील थकबाकीदार शेतकरी लक्ष देवून असून तारीख समोर येताना दिसत नाही. तोच आता पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कर्जमाफीसाठी ३० जून तारीख दिली आहे. पण ३० जूनपर्यंत थांबण्याची गरज नाही. त्याच्याअगोदरच २ लाखांपर्यंत कर्जमाफी होईल, असे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.
दरम्यान अर्थसंकल्पी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत पीक कर्ज थकित असलेल्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले होते. आता त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी खरीप हंगाम सुरू होण्याआधीच दिली जाईल, असे म्हटले आहे. यामुळे ३० जून २०२६ पूर्वीच कर्जमाफी होईल, अशी शक्यता आता व्यक्त केली जातेय.
तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे संकेत कृषिमंत्र्यांनी देताना राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३० जून तारीख दिली आहे. पण त्याच्याअगोदरच २ लाखांपर्यंत कर्जमाफी होईल, अशी माहिती दिली आहे. ही माहिती त्यांनी, खरीप हंगामाच्या नियोजनासाठी पुण्यात आयोजित कार्यशाळेवेळी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह कृषी, मदत व पुनर्वसन, वित्त, जलसंपदा, जलसंधारण, भारतीय हवामानशास्त्र विभाग, वित्त व नियोजन विभागांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी भरणे म्हणाले, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदाच्या मान्सून हंगामात 'एल निनो'चा प्रभाव राहणार आहे. 'मे'च्या शेवटच्या आठवड्यात खरा अंदाज समोर येईल. 'एल निनो'चा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. पावसाचे प्रमाण कमी राहील. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागेल, त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, यावर कार्यशाळेत चर्चा झाली. तर राज्यात खरीप हंगामासाठी १ कोटी ४५ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रासाठी नियोजन केले असून बियाणे मागणीपेक्षा जास्त उपलब्ध आहेत.
संभाव्य 'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. फडणवीस यांनी, संभाव्य 'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना हाती घ्याव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यस्तरीय बैंकर्स कमिटीचा राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत राज्यातील २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांकडे थकबाकी आहे. त्यांच्याकडे ३५ हजार ४७७ कोटींची थकबाकी आहे. तर पीककर्ज, मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचा देखील समावेश आहे.
1. कर्जमाफी कधी मिळणार आहे?
30 जूनपर्यंत मुदत दिली असली तरी त्याआधीच मिळण्याची शक्यता आहे.
2. किती रकमेपर्यंत कर्जमाफी होणार आहे?
2 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
3. ही घोषणा कोणी केली?
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे.
4. कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होईल?
थकबाकीदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
5. योजनेची अधिकृत घोषणा झाली आहे का?
अद्याप अंतिम अंमलबजावणीबाबत अधिकृत तपशील प्रतीक्षेत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.