Farm Loan Waiver : कर्जमाफीबाबत बावनकुळेंनी दिली महत्वाची अपडेट; गाडी, बंगला, फार्महाऊस असणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार का?

Farm Loan Waiver Update | Chandrashekhar Bawankule | Maharashtra : मागीलवर्षी तुफान पावसामुळे राज्याच्या अनेक भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेव्हापासून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी, या मागणीला जोर आला होता.
Farm Loan Waiver Update
Farm Loan Waiver Updatesarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Government news : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंत पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मात्र, ही कर्जमाफी नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी कर्जमाफीसाठी आणखी काही दिवस लागणार असल्याचे आज मीडियाशी बोलताना स्पष्ट केले. ही कर्जमाफी केवळ गरीबांनाच मिळायला हवी, त्यासाठी एसओपी तयार केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालानंतरच कर्जमाफीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

काय म्हणाले बावनकुळे?

कर्जमाफीची घोषणा केली होती, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवीण परदेशी समिती यावर एसओपी तयार करत आहे. अल्प, अत्यल्प भूधारक, ज्यांना कर्जमाफीची गरज आहे, त्यांनाच कर्जमाफी झाली पाहिजे. धनदांडग्या लोकांना, त्यांच्याकडे गाडी, घोडा, बंगला, फार्महाऊस आहे, त्यांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे. गरीब लोकांना कर्जमाफी दिली पाहिजे. त्यासाठी एसओपी तयार करणे सुरू आहे. त्यामुळे थोडा वेळ लागेल, पण कमिटेड कर्जमाफी आम्ही करणार आहोत, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Farm Loan Waiver Update
Ashok Kharat : तू खूप सुंदर आहेस… पण तुझा पती तुला.. अशोक खरात महिलांना कसं ओढायचा जाळ्यात? चौकशीत धक्कादायक माहिती उघड

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करणाताना कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी कधी मिळणार, याच्या प्रतिक्षेत आहेत. ता. ३० सप्टेंबर २०२५ रोजीपर्यंत पीक कर्ज थकित असलेल्या शेतकरीच या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली होती. याबाबतही अद्याप संभ्रम आहे.  

Farm Loan Waiver Update
Congress Politics : भाजपला मोठा धक्का, तीन माजी आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मागीलवर्षी तुफान पावसामुळे राज्याच्या अनेक भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेव्हापासून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी, या मागणीला जोर आला होता. खरंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांकडूनही कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी केली जात होती. अर्थसंकल्पात त्याची घोषणा झाली असली तरी ही कर्जमाफी नेमकी कधी मिळणार, याबाबत संभ्रम आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com