

Mumbai News : राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पार पडली. यावेळी राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. येत्या काळात राज्यातील ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून मोफत धान्य वाटप केले जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ मिळणार असल्याची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली.
राज्यातील अनेक भागात पाऊस न पडल्याने खरीप हंगामासह रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून गेला. राज्यात सध्या भीषण दुष्काळ पडला आहे. पाऊस नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या देखील गंभीर बनली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील शेतकऱ्यांसमोर आहे. दरम्यान अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतला असून येत्या काळात राज्यातील ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून मोफत धान्य वाटप केले जाणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने प्रत्येकी पाच किलो मोफत धान्य मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षत्येखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १४ निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय झाला आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या या निर्णयानुसार, प्रत्येक व्यक्तीला तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू याप्रमाणे धान्य दिले जाईल. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्य्र रेषेखालील आणि डिबीटी (DBT) योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :
नर्मदा-तापी वळण योजना (जलसंपदा विभाग) : नंदुरबार जिल्ह्यातील या योजनेसाठी 5 हजार 548 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. सहा वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून सुमारे 26 हजार 526 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असून 11.50 मेगावॉट वीजनिर्मितीही केली जाईल.
आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई (गृह विभाग) : ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी (MPID) न्यायाधिकरण स्थापन केले जाणार असून, 90 दिवसांत प्रकरण निकाली काढण्याची कालमर्यादा असेल. यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ (वैद्यकीय शिक्षण विभाग) : आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EBC, SEBC, EWS) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यात भरीव वाढ मिळणार आहे.
शिक्षकांसाठी आर्थिक सुविधा (शालेय शिक्षण विभाग) : शालार्थ प्रणालीत समाविष्ट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरबीआयकडे नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
खासगी अनुदानित शाळांसाठी कायदा (शालेय शिक्षण विभाग) : खाजगी अनुदानित शाळांच्या नियमनासाठी सर्वसमावेशक असा 'महाराष्ट्र खाजगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, 2026' च्या प्रारूपास मंजुरी देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.