

Maharashtra Gazette Notification : महाराष्ट्र सरकारने दहशतवाद आणि कट्टरपंथी विचारसरणीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने 6 ऑगस्ट 2026 रोजी असाधारण राजपत्र अधिसूचना जारी करत दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे आढळलेल्या 114 प्रकाशने, PDF मासिके, दस्तऐवज आणि डिजिटल साहित्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे महाराष्ट्रात दहशतवादविरोधी कारवाईला आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) तपासादरम्यान काही कट्टरपंथी साहित्य आणि डिजिटल कंटेंटचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले. या साहित्यामध्ये हिंसक दहशतवादाचे समर्थन, कट्टरपंथी विचारांचा प्रचार, तरुणांना प्रभावित करण्याचा प्रयत्न तसेच दहशतवादी संघटनांमध्ये भरतीसाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले.
राजपत्रानुसार, या कारवाईसाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), 2023 मधील कलम 98(1) अंतर्गत आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित 114 प्रकाशनांच्या भौतिक तसेच डिजिटल प्रती जप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
‘Voice of Khurasan Magazine’, ‘The Revolutionary Resurgence’, ‘Kashmir Kifah – Resilience & Courage’, ‘The Soul of Resistance’ आणि ‘Nawai Gazwa-e-Hind’ यांसारख्या प्रकाशनांचा या यादीत समावेश असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. ही प्रकाशने विविध प्रतिबंधित दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे सरकारने म्हटले आहे.
या आदेशानुसार संबंधित साहित्य प्रकाशित करणे, प्रसारित करणे, वितरित करणे, विक्री करणे, सार्वजनिकरित्या प्रदर्शित करणे किंवा त्याच्या भौतिक अथवा डिजिटल प्रती जवळ बाळगणे आणि संग्रहित करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे की, “आतंकवाद को बढ़ावा देने वाले विभिन्न लेख, पोस्ट, ऑडियो, वीडियो, साथ ही इलेक्ट्रॉनिक और डिजिटल दस्तावेज प्रसारित किए जा रहे हैं.”
सरकारने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणारे साहित्य, पोस्ट किंवा दस्तऐवज आढळल्यास त्याची माहिती संबंधित तपास यंत्रणांना द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी कारवाई, ISIS नेटवर्क, अल-कायदा संबंधित साहित्य आणि ऑनलाइन कट्टरपंथी कंटेंटच्या प्रसारावर सरकारने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.