Maharashtra News: राज्यात विविध ठिकाणी खासगी रुग्णालयांकडून अवाजवी उपचार दर आकारले जात असून नागरिकांकडून आर्थिक लुटीच्या अनेक तक्रारी समोर येत असतात.आता महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं शुक्रवारी(ता. 16 ऑक्टोबर) अवाजवी उपचार दर आकारत रुग्णालयाकडून होत असलेली आर्थिक लूट आणि मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या नव्या निर्णयानुसार,आता राज्यातील सर्व खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय आस्थापनांना त्यांच्याकडील सर्व उपचार,वैद्यकीय चाचण्या आणि सेवांचे दरपत्रक रुग्णांना सहज दिसू शकेल, अशा प्रमुख ठिकाणी ठळकपणे लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय आस्थापनांसाठी वैद्यकीय सेवा आणि विविध उपचारांचे दरपत्रक (रेटकार्ड) मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये ठळकपणे लावणे आता कायदेशीररित्या बंधनकारक असणार आहे. सर्वसामान्यांना रुग्णालयाची पायरी चढायची म्हटलं तरी अंगावर काटा उभा राहतो, इतकी उपचार पद्धती महाग झाली आहे.
महाराष्ट्र सरकारचा या निर्णयामागचा उद्देश हा रुग्णांची बिलांच्या बाबतीत होणारी लूट थांबवणं हा असून आणि उपचारांपूर्वी त्यांना संभाव्य खर्चाची अचूक कल्पना देणे,हा आहे.तसेच दाखल रुग्णाच्याबाबतीत उपचार किंवा सेवादरांमध्ये काही बदल झाले,तर सुधारित दरपत्रक रुग्णालयांना तत्काळ अपडेट करावे लागणार आहे.
सरकारकडून या निर्णयाची काटेकोर पद्धतीनं अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक आणि महानगरापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच सरकारच्या या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या किंवा रेटकार्ड न लावणाऱ्या रुग्णालयांवर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.