

विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घाईगडबडीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. पडताळणीत सुमारे २ कोटी ४७ लाख लाभार्थींपैकी तब्बल ८१ लाख लाभार्थी अपात्र असल्याचे उघड झाले आहे. यामुळे २४ हजार ३०० कोटी रुपयांचा निधी अपात्र लोकांच्या हाती गेला आहे. हा पैसा वसूल करणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र, याबाबत ना सत्ताधाऱ्यांना खंत, ना विरोधक आक्रमक. करदात्यांचा पैसा राजकीय फायद्यासाठी वापरून 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' हेच सरकारने दाखवून दिले आहे.
योजनेबाबत,
१) महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून २८ जून २०२४ रोजी मंजूर
२) अधिकृत अंमलबजावणी जुलै २०२४ पासून सुरू
३) पहिला हप्ता (जुलै आणि ऑगस्टचा मिळून ३००० रुपये) ऑगस्ट २०२४ मध्ये महिलांच्या बॅंक खात्यांत जमा
पैसै अदा - २० महिने
दर महिना प्रतिमहिला- १५००
सुमारे ८१ लाख अपात्र
अपात्र महिलांवर २४ हजार ३०० कोटी
२०२४-२५
२ कोटी ४७ लाख
खर्च ३२ हजार ४७० कोटी
२०२५-२६
२ कोटी ३८ लाख
खर्च २९ हजार ५७० कोटी
१) एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला अपात्र का ठरल्या?
२) सरकारी तिजोरीतून किती कोटी रुपये वाया गेले?
३) याला जबाबदार कोण?
४) ज्या सरकारी कर्मचार्यांनी लाभ घेतला त्यांच्यावर कारवाई काय करणार?
५) करदात्यांना आणखी किती गृहीत धरणार?
१. ३७ हजार ५४ कोटी रुपये (२०२६-२७, सुधारित अंदाज)
२. ४५ हजार ८९१ कोटी (२०२५-२६)
३. २६ हजार ५३६ कोटी (२०२४-२५)
४. कर्ज ११ लाख कोटींचा टप्पा ओलांडणार (२०२६-२७)
निधीतून काय करता आले असते?
१. काही गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा
२. मोठ्या प्रमाणावर सिंचन व्यवस्था, शेततळी
३. ग्रामीण रस्ते व पूल
४. डिजिटल वर्ग खोल्या
५. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती निधी
१. ई-केवायसी केली नाही अशा महिला अपात्र ठरल्या, त्यांचेच मानधन थांबविले.
२. २५ लाख महिलांची केवायसी चुकली होती त्यात दुरूस्ती केली
३. योजना सूरू केली तेव्हा योजनेचे निकष स्पष्ट होते.
४. आधी पडताळणी केली असती तर वर्ष गेले असते.
लाभाचे निकष
१. महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी
२. वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.
३. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.
४. महिलेचे वैयक्तीक बॅंक खाते आधारकार्डशी जोडलेले असणे आवश्यक
१. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती प्राप्तीकर भरणारी असेल तर
२. कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असेल तर.
३. कुटुंबातील सदस्य आजी माजी खासदार किंवा आमदार असतील तर
४. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ४ चाकी वाहन आहे.
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सूरू केली, तेव्हा अर्जदारांची नीट छाननी केली नाही. किंबहुना महिला व बालकल्याण खात्याला फार चिकीत्सा करु नका, असेच सांगण्यात आले होते. कारण सत्ताधार्यांना मतं मिळवायची होती. आता त्या वाटपातील ८१ लाख लाभार्थी अपात्र असल्याचं सतोर आलं. महालेखापरिक्षकांनी सुचना केल्यानंतर शासनाने छाननी केली. हे पैसे वसूल कसे करणार. ते शक्यच नाही. एकीकडे शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांचे वेतन देण्यास विलंब होतो. मतदारांनीच याचा जाब विचारायला हवा.
- नीरज हातेकर, अर्थशास्त्राचे प्राध्यापक
केवायसीसाठी २ वेळा मुदतवाढ देण्यात आली. ई- केवायसी करुनही ज्या महिलांना लाभ मिळत नाही, त्यांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये.
- आदिती तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.