

कर्नाटकच्या राजकारणात मोठा बदल घडत असून काँग्रेसने राज्यात नव्या नेतृत्वाची घोषणा केली आहे. पक्षाच्या निर्णयानंतर डी.के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. शपथविधी सोहळ्यात त्यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन पदाची शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली नव्या मंत्रिमंडळाचीही घोषणा करण्यात आली असून एकूण 13 आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.
या सोहळ्यात डॉ. जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यापूर्वी राज्यात अनेक उपमुख्यमंत्री नेमले जाऊ शकतात, अशी चर्चा रंगली होती. मात्र काँग्रेसने अखेरीस जी. परमेश्वर यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी दिली.
डी.के. शिवकुमार – मुख्यमंत्री
डॉ. जी. परमेश्वर – उपमुख्यमंत्री
के.एच. मुनियप्पा – मंत्री
के.जे. जॉर्ज – मंत्री
एम.बी. पाटिल – मंत्री
रामलिंगा रेड्डी – मंत्री
सतीश जारकीहोली – मंत्री
कृष्णा बायरेगौड़ा – मंत्री
प्रियंक खड़गे – मंत्री
यू.टी. खादर – मंत्री
ईश्वर खंड्रे – मंत्री
यतींद्र सिद्धारमैया – मंत्री
यरथी सुरेश – मंत्री
शरण प्रकाश पाटिल – मंत्री
विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैया यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामैया यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियंक खरगे यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाल्याने पक्षाने नव्या पिढीच्या नेतृत्वावर भर दिल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या निवडीपूर्वी पक्षश्रेष्ठींसोबत अनेक फेऱ्यांच्या बैठका झाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिवकुमार यांची अधिकृतपणे निवड करण्यात आली. राज्यातील विविध प्रदेश, समाजघटक आणि पक्षातील गटांचा समतोल राखण्याचा प्रयत्न या मंत्रिमंडळातून करण्यात आला असल्याचे मानले जात आहे.
मंत्रिपदासाठी अनेक इच्छुक नेते रांगेत असताना मर्यादित जागांमुळे काहींमध्ये नाराजीची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. मात्र आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या कामगिरीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.