

Maharashtra Heat News update: : राज्यात बहुतांश ठिकाणी अंगाची लाही-लाही होत असून उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. कमाल तापमान चाळिशी पार गेलं आहे. विशेषत: सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा धोका असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. आज कमाल तापमान 37-43 अशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात आणखी 2-3 अशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमाना 40-43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
आज, 15 एप्रिल रोजी मुंबईसह राज्यातील 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान कोरडे, उष्ण आणि काही भागात दमट राहण्याचा अंदाज आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघात होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. उष्माघातांच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारनकडून 'ऑरेंज' आणि 'रेड' अलर्ट देण्यात आले आहे. दरम्यान दुपारी 12 ते 4 या वेळेत सर्व प्रकारची बाहेरील कामे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत
वाढत्या उष्णतेपासून नागरिकांचे आणि उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. कामगारांना उन्हामुळे त्रास होऊ नये म्हणून कामाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. सकाळची कामाची वेळ 6 ते 11 वाजेपर्यंत असेल आणि संध्याकाळची वेळ दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत असेल. स्थानिक प्रशासनाला बांधकाम क्षेत्र, औद्योगिक वसाहती आणि फेरीवाल्यांच्या क्षेत्रात या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नवीन 'मानक संचालन प्रक्रिया' (SOP) लागू करण्याची घोषणा केली. या नवीन नियमांनुसार, उष्णतेची लाट असताना दुपारी कामाच्या वेळेवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने केवळ कामावर बंदी घातली नसून इतर सुविधा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत.
दुपारी 12 ते 4 या वेळेत सर्व प्रकारची बाहेरील कामे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कामगारांना उन्हामुळे त्रास होऊ नये म्हणून कामाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
सकाळची कामाची वेळ 6 ते 11 वाजेपर्यंत असेल आणि संध्याकाळची वेळ दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत असेल.
स्थानिक प्रशासनाला बांधकाम क्षेत्र, औद्योगिक वसाहती आणि फेरीवाल्यांच्या क्षेत्रात या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे.
सरकारने राज्यातील 15 जिल्ह्यांना अति-संवेदनशील जाहीर केले आहे. यात लातूर, अमरावती, यवतमाल, वाशिम, अकोला, बुलढाणा, नागपुर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड या जिल्हांचा समावेश आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात उष्णतेची तीव्रता सर्वाधिक आहे. तसेच मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या शहरांमध्ये सिमेंटच्या जंगलामुळे 'अर्बन हीट आयलंड' प्रभाव जाणवत असून तापमान अधिकच वाढत आहे.
उष्माघाताच्या रुग्ण संख्येत पुण्यात वाढ होऊ लागली आहे. दीड महिन्यात उन्हाच्या तडाख्याने ७७० रुग्ण महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. यामध्ये उष्णतेसंबंधी विविध आजारांचा आणि कारणांचा समावेश आहे. ही आकडेवारी महापालिकेच्या रुग्णालयांमधील आहे. याशिवाय खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल झाले असण्याची शक्यता असून, ही आकडेवारी हजाराच्या पुढे असल्याचा अंदाज आहे.
पुढील 48 तास कोकणवासीयांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. मुंबईसह सर्व आठही जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचं संकट असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील किनारी भागात अधिक अस्वस्थता जाणवेल. कमाल तापमान 32-36 अशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील हवामान मुख्यत: कोरडे राहील. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर भागात आज पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान 38-42 अशांपर्यंत जाण्याची शक्यता असून तीव्र उष्णता जाणवू शकते. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती राहील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.