Trimbakeshwar Darshan Pass Scam: त्रंबकेश्वर दर्शन पास घोटाळा! कडलक अटकेनंतर राजकारण तापलं! भाजप विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष तीव्र

Nashik news update Trimbakeshwar Darshan Pass Scam: त्रंबकेश्वर दर्शन पास गैरव्यवहार प्रकरणात पुरुषोत्तम कडलक यांच्या अटकेनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला आहे.
Trimbakeshwar Darshan Pass Scam:
Trimbakeshwar Darshan Pass Scam:Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News: आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथील दर्शनाचा वाद गेले काही दिवस चर्चेत आहे. पैसे घेऊन दर्शन घडविण्याचा आरोप होत आहे. हे प्रकरण रविवारी थेट पोलिसांपर्यंत पोहोचले.

त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन घडविण्यासाठी तीन हजार रुपये घेतले जाण्याचा आरोप आहे. या संदर्भात काही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याविषयी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

या संदर्भात त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक यांना पोलिसांनी अटक केली. कडलक यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चांगली चर्चा रंगली आहे.

Trimbakeshwar Darshan Pass Scam:
Santosh Bangar News: मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली, फोनही उचलत नाहीत; त्यांना घरी बसवा! शिंदेंसमोरच बांगर यांची डरकाळी..

यासंदर्भात आता राजकीय आरोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नंदन भास्करे यांनी सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केला आहे. पुरुषोत्तम कडलक हे मंदिराचे विश्वस्त आहेत. या मंदिरात अन्य बडी मंडळी देखील विश्वस्त आहे. हे विश्वस्त नियमितपणे भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करतात. त्यांच्यावर आजवर कारवाई झालेली नाही.

Trimbakeshwar Darshan Pass Scam:
MPSC: एक परीक्षा, अनेक नोकऱ्या! सरकारचा मोठा निर्णय ‘निपुण सेतू’ योजना काय आहे?

कडलग राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि श्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षांचा त्यांनी पराभव केला होता. नगरपालिका निवडणुकीत आक्रमक राहिल्याने ते भाजपच्या टारर्गेट वर होते.

दोन दिवसांपूर्वी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर कडलक यांनी भोसले यांचा चांगलाच समाचार घेतला. या टीकेला त्यांनी वारकरी समाजाच्या वतीने अतिशय परखड उत्तर दिले. त्याचा भाजपचा समाचार घेतला.

Trimbakeshwar Darshan Pass Scam:
TET Exam: टीईटीमुळे मिळाला न्याय! तब्बल 13 वर्षांनंतर पगार सुरू, कोर्टाचा ZP प्रशासनाला दणका

भाजपाच्या राजकारणाला विरोध म्हणून पुरुषोत्तम कडलग यांना रविवारी रात्री अचानक अटक करण्यात आली. फिर्यादीत कुठेही कडलक यांचे नाव नाही. मध्यरात्रीनंतर अचानक पोलीस सक्रिय झाले. त्यांनी कळलं त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये सत्ताधारी पक्षाचा राजकीय विरोधकांना अडचणीत आणण्यासाठीचा डाव आहे, असे भास्करे म्हणाले.

नंदन भास्करे यांच्या आरोपाने त्रंबकेश्वर मंदिर दर्शनाला राजकीय वळण लागले आहे. पोलिसांची कारवाई देखील चर्चेचा विषय आहे. त्रंबकेश्वर दर्शनाचा वाद सत्ताधारी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस या वळणावर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com