Shivraj Rakshe Allegations : शिवराज राक्षेच्या चितपटवर दुसरी बाजू आली समोर, कुस्ती संघाने दिले 'हे' स्पष्टीकरण

maharashtra kesari kushti spardha Shivraj Rakshe Allegations : महाराष्ट्र केसरीमध्ये शिवराज राक्षे हा चीतपट नसताना त्याला चितपट दिल्याने त्याने पंचांना लाथ मारली. शिवराज खरच चितपट होता की नाही, हे कुस्तीगर संघाने सांगितले आहे.
shivraj rakshe prithviraj mohol
shivraj rakshe prithviraj moholsarkarnama
Published on
Updated on

Shivraj Rakshe Allegations : महाराष्ट्र केसरीच्या सेमी फायनलमध्ये शिवराज राक्षे हा चीतपट नसताना त्याला चीतपट दिल्याने त्याने पंचांना लाथ मारली, त्यांची काॅलर पकडली. शिवराज खरच चीतपट होता की नाही, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. कुस्तीच्या व्हिडिओमध्ये त्याचे दोन्ही खांदे जमिनीला टेकलेले दिसत नाही. त्यामुळे तो चितपट नसल्याचे सांगितले जात आहे. आता या वादावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी म्हणणे मांडले आहे.

भोंडवे यांनी सांगितले की, जागतिक कुस्ती महासंघाच्या नियमाने मॅटवरील पंचानी कुस्तीचा निर्णय चितपट दिला असेल व त्यास साईड पंच व मॅट चेअरमन यांची मान्यता असेल तर अशा चितपट झालेल्या कुस्तीचे चॅलेंज स्वीकारले जात नाही . शिवराज राक्षे व त्याच्या कोचने चितपटाला चॅलेंज करुन ते अपिल ऑफ ज्युरी कडे निर्णय मागण्यासाठी आले त्यावेळी अपिल ऑफ ज्युरीने तीन पंचाना एकत्र बोलावून त्यांना त्यांचा निर्णय विचारला तीनही पंचांनी एकमताने कुस्ती चितपट झाली आहेस असा निर्णय दिला. त्यामुळे अपिल ऑफ ज्युरीने जागतिक नियमानुसार व्हीडिओ पाहण्यास नकार दिला.

shivraj rakshe prithviraj mohol
Union Budget and Income Tax Rule : ...म्हणून 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न झाले 'टॅक्स फ्री' ; निर्मला सीतारामन यांनीच सांगितली 'इनसाइड स्टोरी'!

शिवराज राक्षेचे कोच यांनी काका पवार यांच्या तालमीतील कुस्तीगीरांवर जाणून बुजून अन्याय केला जात असल्याचा आरोप केला त्यावर देखील भोंडवे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, काकासाहेब पवार यांच्या तालीमीतील अनेक मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातील 10 ते 12 कुस्तीगीरांनी विविध वजनगटात पदके मिळवली आहे. जाणून बुजून अन्याय करायचा असता तर तिथे सुध्दा त्यांच्यावर अन्याय झाला असता परंतु तसे झाले नाही .

पंचावर कारवाई का नाही?

शिवराज राक्षे याने पंचावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना भोंडवे म्हणाले, कोणाची पंचाच्या निर्णया विरुध्द काही तक्रार असेल तर त्याबाबत लेखी तक्रार त्यांनी कुस्तीगीर संघाकडे करणे आवश्यक आहे. लेखी तक्रार आल्यानंतर कुस्तीगीर संघ त्या बाबत शहानिशा करुन नक्कीच कुस्तीगीरांना न्याय देईल.

शिवराज, महेंद्रवरील कारवाईचे समर्थन

कुस्तीगर संघाकडून शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पंचांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्याबाबत बोलताना भोंडवे म्हणाले,शि वराज नुकताच नोकरीस लागलेला आहे व महेंद्रला सुध्दा नोकरीस लागणार आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यावर त्यांना नोकरीवर केसचा निकाल लागे पर्यंत घेतले जाणार नाही. त्यामुळे त्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते हा विचार करुन संबधित पंचानी गुन्हा दाखल न करण्याचा निर्णय घेतला.

shivraj rakshe prithviraj mohol
Shivsena News : फडणवीस, अजितदादांच्या पक्षाप्रमाणेच आता शिंदेंचे मंत्रीही 'कॉमन मॅन'साठी मैदानात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com