अजित पवार यांचं राज्यासाठी योगदान मोठं होतं, यासाठी भारतीय जनता पार्टीमधील नेते प्रचार करत असतील तर ही बाब चांगली आहे. उमेदवार सुनेत्रा पवार यांना दोन लाखापेक्षा जास्त लीड मिळेल. सर्वांना वाटत होतं की, दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, पण सुनेत्रावहिनी पवार मुख्यमंत्रीपदाची ही आशा पूर्ण करू शकल्या तर सर्वांनाच आनंद होईल, असे मत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान व्यक्त केलं.
नाशिकमधील बहुचर्चित आयटी लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी शफी शेख याला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. आरोपीने स्वतः आपल्याला कारागृहात इतर कैद्यांनी मारहाण केल्याचे न्यायालयाला सांगितले आहे.
मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी प्रक्रिया आज सुरू करण्यात आली. मात्र, सकाळी १० वाजता सुरू होणारी ही प्रक्रिया तब्बल ३ तास उशिराने सुरू करण्यात आली. सुरुवातीला हॉल क्रमांक १३ मध्ये होणारी तपासणी नंतर हॉल क्रमांक ५४ मध्ये हलवण्यात आली.
या प्रक्रियेत एकूण २० मशीनची तपासणी करण्यात येत असून, संपूर्ण प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तात पार पडत आहे. या घडामोडींमुळे या तपासणी प्रक्रियेकडे राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी नागपूर महानगर पालिकेत स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेत आपल्याला डावलल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रक्रियेबाबत मनपा विरोधी पक्षनेते यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
- स्वीकृत सदस्य पदासाठी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. अनेक नगरसेवकांनी मागणीच्या आधारे अर्ज दाखल केले. दरम्यान, प्रदेश काँग्रेस कमिटीकडून निवडणुकीत पराभूत झालेल्यांना स्वीकृत सदस्य पद देऊ नये, असे निर्देश देण्यात आले होते..
अकोला जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळं शैक्षणिक संस्थांच्या वेळांमध्ये बदल. आता अकोल्यात सकाळी 11 वाजेपर्यंत राहणार शाळा सुरू. प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी असे, आदेश दिले. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची गंभीर दखल घेत शैक्षणिक संस्थांच्या वेळांमध्ये तातडीने बदल करण्याची सूचना बजावल्या. सर्व शाळा सकाळी 11 वाजेपर्यंत भरविण्यात याव्या. त्यानंतर शाळा सुरू ठेवल्यास संबंधित शाळेवर प्रशासकीय तथा दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे. असेही आदेशमध्ये नमूद आहे.
अकोल्याचे तापमान सलग दोन दिवसांपासून 44.2 अंश सेल्सिअस'वर कायम. कालचं अकोल्याचा तापमानाचा पारा होता 44.2 अंश सेल्सिअस'वर. मागील काही दिवसापासून अकोल्याचे तापमाना पारा 40 अंशापार कायम. आठवड्याभरापासून तापमानात मोठी वाढ. आज देखील तापमानाने गाठला उच्चांक. अकोल्यात 44.2 अंश सेल्सियस इतकं झाली तापमानाची नोंद. 19 एप्रिपपर्यत अकोल्यासह विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम. त्यामुळे अकोलेकरांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला स्पष्ट पाठिंबा दर्शवला. मात्र, डिलिमिटेशन म्हणजेच परिसीमन प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुस्पष्टता असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत ज्या जागेवर उभी आहे, तो भाग कब्रस्तानचा आहे. इथे मुडदे गाडले जायचे, त्यामुळे महापालिकेला ग्रहण लागले आहे. यातून मुक्ती हवी असेल तर महापालिकेची इमारत चांगल्या जागेवर बांधा असे विधान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पलटवार करत खोचक सवाल केला आहे. त्यांनी, तुम्ही अनेक वर्ष या महापालिकेत नगरसेवक होतात, तुमचा पक्ष पंचवीस वर्षापासून याच जागेतून कारभार हाकत होता. तेव्हा तुम्हाला इथे आत्मे दिसले नाहीत का? असा टोला लगावला आहे.
सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी सोडत (लॉटरी) लागलेल्या मुलांची निवड यादी व प्रतिक्षा यादी राज्यस्तरावरून आर.टी.ई पोर्टलवर जाहीर करण्यात आली आहे. बालकांना प्रवेश घेण्यासाठी 10 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत तालुका पंचायत शिक्षण विभागातील आर. टी. ई. 25 टक्के अर्ज पडताळणी समितीकडे जाऊन मूळ कागदपत्रे तपासून घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करुन घ्यावा.
काँग्रेस पक्षाने पुणे जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शिरूर आणि बारामती या दोन भागांसाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्याचा फॉर्म्युला राबवला जाणार आहे. येत्या १० दिवसांत नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा होणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी दिली आहे.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील मुलींचे लैंगिक शोषण करून आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी परतवाडा येथील अयान अहमद याला अटक केली. यामध्ये आतापर्यंत तपासात ८ पीडितांचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो समोर आले आहेत.11 तारखेला परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली मात्र पाच दिवस उलटूनही एकही पिडिता किंवा त्यांचे कुटुंबीय तक्रारीसाठी पुढे आलं नाही. त्यामुळे भाजपा आमदार प्रवीण तायडे यांनी पुन्हा एकदा पिडिता आणि त्यांचे कुटुंबीयांना आवाहन केले आहे, त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावं त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असं आवाहन आमदार प्रवीण तायडे यांनी केलं.
महिला आरक्षणाला आमचा विरोध असण्याचे कारण नाही. कोणाला वाटत असेल की आपण आरक्षण देऊन उपकार करतोय. पण त्या मातेने आपल्याला जन्म दिला आणि आपल्याला जग पाहण्याची संधी दिली, तिचा आपल्यावर आहे. नारी शक्ती वंदन विधेयकाची चर्चा करतो, त्यावेळी बेढी बचाव अन् बेटी पढाव, असे अभियान राबवावे लागते, हे विरोधीभासी चित्र दिसून येते, असे टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर लगावला.
महिला आरक्षण विधेयकावर बोलताना निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव एका अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणात घेतले. त्यावर खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यासह विरोधी पक्षाचे खासदार हे दुबे यांच्यावर संतापले. त्यामुळे लोकसभेत मोठा गदरोळ झाला. अखेर लोकसभा सभापतींनी दुबे यांचे विधान रेकॉर्डवर जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
अकोला तालुक्यातील परतवाडा येथील लैगिंक शोषण घटनेच्या तपासप्रकरणी अल्पसंख्याक आयोग परतावाड्यात पोचला आहे. या आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तसेच आयोगाचे सदस्य जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटणार आहेत. या घटनेप्रकरणी आतापर्यंत काय झालं याचा आढावा घेतला जाणार आहे.
नारी शक्ती विधेयकावर (महिला आरक्षण विधेयक) आज आणि उद्या बारा तास चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर उद्या (ता. १६ मार्च) दुपारी चार वाजता मतदान होणार आहे.
भाजपकडून राज्यघटना हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारने २०२३ मध्ये मंजून झालेले विधेयक लागू करावे, अशी मागणी काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी केली आहे. मात्र, केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शाह यांनी विधेयक पुनर्स्थापित झाल्यानंतरच त्याच्या मेरिटवर चर्चा होऊ शकते. विधेयक पुनर्स्थापित करायचे की नाही, या स्थितीत सध्या हे विधेयक आहे. नियमानुसार विधेयकाच्या तांत्रिक मुद्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. पण मेरिटवर आक्षेप घेतला जाऊ शकत नाही, असे उत्तर शाह यांनी दिले.
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे. आरक्षण सादर करण्याच्या बाजूने २५१ खासदारांची मतं पडली आहेत, तर १८५ खासदारांनी विधेयक सादर करण्यासाठी विरोध दर्शविला आहे. या आरक्षण विधेयकावर सध्या चर्चा सुरू आहे.
मुंब्रा प्रभाग 30 मधून निवडून आलेल्या MIM नगरसेविका सहर शेख सध्या संपर्काबाहेर आहेत. वडिलांच्या जात वैधता प्रकरणामुळे त्यांच्यावर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. बनावट कागदपत्र वापरल्याची तक्रार झाल्यानंतर त्या अचानक गायब झाल्या असून त्यांचा फोनही लागत नाही, त्यामुळे त्यांचे पद धोक्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 14 एप्रिल रोजी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक उत्साहात, शांततेत पार पडली असताना एका अज्ञात व्यक्तीने औरंगजेबाचे पोस्टर मिरवणूकीत झळकावले आणि एकच खळबळ उडाली. पोस्टर झळकावणाऱ्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
नाशिकमध्ये आज TCS कंपनी ते कलेक्टर ऑफिस असा बाईक मोर्चा काढण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. नाशिकमधील TCS कंपनीत हिंदू कर्मचारी महिलांचे झालेले लैगिंक शोषण व धर्मांतर प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. दोषींच्या घरावर बुलडोजर फिरवा त्यांना फाशी द्या अशी मागणी आमदार फरांदे यांनी केली.
शिक्षणाचा 'लातूर पॅटर्न' जगप्रसिद्ध आहे. पण याच लातूरमध्ये एका खासगी शाळेच्या शिक्षकानं संतापजनक कृत्य केलंय.. धाब्यावर मित्रांसोबत दारू पित सिगारेट ओढत विद्यार्थ्यांचे पेपर तपासलेत. एवढंच नव्हे तर त्याने त्याच्या मद्यपी मित्रानांही पेपर तपासायला दिल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय... या घटनेमुळे आता पालकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.. तर मद्यपी शिक्षकाच्या या कारनाम्यानंतर शाळा प्रशासन काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.
नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी एचआर निदा खान फरार आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून तीचा शोध घेतला जात आहे. दिल्ली ब्लास्टशी तिचे कनेक्शन असल्याचा संशही व्यक्त केला जात आहे. तसेच ती भिवंडीत लपल्याचा संशय आहे.
अशोक खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला 3 महिन्यापूर्वी होती, मग तीन महिने ही माहिती का थांबवली होती? असा सवाल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला आहे.
नाशिकमधील आयटी कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम पाहणारी आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार असा आरोप असलेल्या निदा खानचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचा संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त केला जातोय.
बाणेर येथील आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून भाजपच्या विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये पुणे महापालिकेतच जोरदार राडा झाल्याची घटना बुधवारी घडली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा वाद माजी नगरसेविका राजश्री काळे आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यात झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नाशिकमधील नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा प्रकरणाची दखल कंपनीच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयाने घेतली आहे. या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडून कंपनीची चौकशी सुरू आहे. तपासाच्या काळात कामकाजात अडथळा येऊ नये आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम'चे करण्याचे आदेश दिले आहेत.
शेताला पाणी मिळत नाही पण खरातला पाणी मिळतं. ही प्रकरण पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून ठेवलेली ती आता बाहेर काढतात, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खरात प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. बहुचर्चित महिला आरक्षण लागू करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. आजपासून पुढील 2 दिवस हे अधिवेशन असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.