Maharashtra Politics Update: गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर, दुपारी होणार आगमन

Political Breaking Live Headlines Updates : गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांचा पुणे दौऱ्यावर,पालघर पोलीस कर्मचाऱ्यानं आयुष्य संपवलं; पत्नीवर मानसिक छळाचा आरोप, यासह राज्य आणि देशतील दिवसभरातील राजकीय घडामोडींचे वेगवान अपडेट...
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का नाराज कार्यकर्ते शिवसेनेत

माणगाव नगर पंचायतीच्या नगरसेवकांसह सुनील तटकरे यांच्या खंद्या समर्थकांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. माजी नगरसेवक संदिप खरगटे, दिलीप जाधव, जयंत बोरडे, रत्नाकर उभारे , भाग्यश्री यादव, माजी उपनगराध्यक्ष निलिमा मेहता यांचा शिवसेनेत प्रवेश केला.

गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर, दुपारी होणार आगमन

गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहे. दुपारी त्यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. तेथून ते मुंढवा येथे भारत फोर्ज कंपनीला भेट देणार आहेत. भारत फोर्जच्या ६० वर्षांच्या वाटचालीचे स्मरण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्मृतीफलकाचे अनावरण करणार आहेत. तेथून तळेगाव दाभाडे येथील एनएचईसी प्रकल्पाच्या ठिकाणी बहुराज्य सहकारी संस्थेच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.