Maharashtra Live Politics Update : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पीक विम्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत

Political Breaking Today Live Headlines Updates : महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारचा 15 हजार कोटींचा प्रस्ताव सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. महाराष्ट्र आणि देशातील विविध ताज्या घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

Gadchiroli Crime News : गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमली पदार्थ विरोधी कारवाई

गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमली पदार्थ विरोधी कारवाई केली. यामध्ये 1 कोटी 20 लाख रुपये किमतीच्या 240.5 किलो अमली पदार्थासह एकूण 1 कोटी 46 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Farmer News Update : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पीक विम्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत

रब्बी हंगामासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले आहे. गहू आणि हरभरा पिकाचा यात समावेश करण्यात आला आहे. गहू पिकासाठी प्रतिहेक्टर 45 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.