Maharashtra Politics Update : देश-विदेशात दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लीकवर

Political Breaking Today Live Headlines Updates : ऊसाला साडेचार हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेल्या आंदोलनाला ४० तास उलटून गेले आहेत, यासह आजच्या राज्यभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

सरकारची आणि राजू शेट्टींची चर्चा फिस्कटली; आंदोलन पुढे कायम ठेवण्याचा शेट्टींचा निर्धार

ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची आणि सरकारमधील बोलणी फिस्कटली आहेत. त्यामुळं पुणे-बंगळुरु महामार्ग चक्का जाम आंदोलन पुढे कायम ठेवण्याचा निर्धार राजू शेट्टी यांनी केला आहे.

High Court : 'त्या' रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करा, नांदेड-वाघाळा व परभणी महापालिकेला खंडपीठाचे निर्देश!

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आणि परभणी महानगरपालिकेत सुमारे दोन दशकांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्यास नकार देणारे राज्य शासनाचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास आठ आठवड्यांत मान्यता द्यावी, असे निर्देश न्या. नितीन बी. सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठाने मंगळवारी (ता. तीन) दिले.

हसन मुश्रीफांना मोठा दिलासा : घोरपडे कारखानाप्रकरणी ईडीचा क्लोजर रिपार्ट कोर्टाकडून मंजूर

कोल्हापूरमधील संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. घोरपडे कारखान्याशी संबंधित ईडीने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट पीएमएलए कोर्टाने मंजूर केला आहे. त्यामुळे मुश्रीफ यांना कोर्टाकडूनही त्यांना दिलासा मिळाला आहे.

पुण्यात मिठाई, तूप, मावा विक्रेत्यांवर ‘एफडीए’ची धडक कारवाई; चार हजार किलोहून अधिक खाद्यपदार्थ जप्त

पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात धडक कारवाई केली. बाणेर, वानवडी, गणेश पेठ, देहू, कोथरूड, मुंढवा यांसह विविध भागांतील १२ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये लाडू, बुंदी, तूप, मावा, बर्फी आणि अन्य खाद्यपदार्थांचा चार हजार २१ किलोहून अधिक साठा नष्ट आणि जप्त करण्यात आला. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही आस्थापनांचे व्यवसाय निलंबित किंवा स्थगित करण्यात आले.

: शिवभोजन थाळी योजनेसाठी 52 कोटींचा निधी मंजूर

शिवभोजन थाळी योजनेसाठी महायुती सरकारने ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सरकारकडून तशा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ऐन दुष्काळी परिस्थितीत गरजूंसाठी दिलासादायक निर्णय ठरणार आहे.

दादा भूसेंना धक्का : शाळा मान्यतेचे अधिकार काढले

खासगी शाळा मान्यतेचे अधिकार आता प्रधान सचिवांकडे देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. पूर्वी हे अधिकारी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे होते. हे खाते सध्या शिवसेनेचे नेते दादा भूसे यांच्याकडे आहे. या निर्णयातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिल्याचे मानले जात आहे.

राहुल गांधी संविधानिक संस्थांविषयी सातत्याने दिशाभूल करताहेत : नितीन गडकरी

काँग्रेस निवडणूक आयोगाची बदनामी करत आहे. काँग्रेसने निवडणूक जिंकली तर लोकशाही व्यवस्थित आणि हरली तर मतचोरी, हे कसं, असा सवाल करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे संविधानिक संस्थांविषयी सातत्याने दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.

स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही : माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील नवनिर्वाचित बहुमताला सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश आणून तज्ज्ञ व शासकीय स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही, असा कायदेशीर सल्ला भारताचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अजित पवारांच्या तैलचित्रावरून वाद, स्वच्छतागृहाजवळ प्रतिमा लावल्याने राष्ट्रवादीच्या सीमा सावळे संतापल्या...

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील तळमजल्यावर पुरुष व महिला स्वच्छतागृहांच्या मधल्या भागात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तैलचित्र लावल्यामुळे शहरात नवीन वादाला तोंड फुटले असून प्रशासनाच्या या चुकीच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. एवढ्या मोठ्या लोकनेत्याचे तैलचित्र मुख्य सभागृहात लावावे, अशी स्पष्ट मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सीमा सावळे यांनी आधीच केली होती, परंतु अत्यंत अपमानास्पद ठिकाणी प्रतिमा लावून नेत्याचा अवमान केला जात असल्याचा गंभीर आक्षेप घेत त्यांनी प्रशासनाला हे तैलचित्र तात्काळ तिथून हटवण्याचा सज्जड दम भरला आहे. या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, प्रशासनाकडून हे तैलचित्र त्याच ठिकाणी ठेवले जाणार की तातडीने एखाद्या सन्मानजनक ठिकाणी हलवले जाणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

राज्य सरकारने टाटाला साखर कारखाना करण्याची परवानगी द्यावी - गोपीचंद पडळकरांची मागणी

राज्य सरकारने टाटासारख्या कंपनीला ऊस कारखाना काढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ऊस दरासाठी आम्हाला तुमच्या दारात यायला नको. तुमची भूक भागत नाही, असा निशाणा साखर कारखानदारांवर साधत, सरकारने साखर कारखान्यांमधील अट काढण्याची मागणी करण्याऐवजी टाटासारख्या देशातील कंपनीला पाच-दहा लाख टन गाळप क्षमतेचा साखर कारखाना काढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. उसाला पाच हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी सांगलीमध्ये रयत क्रांती संघटनेच्यावतीने आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

उसाला ४,५०० रुपये पहिली उचल देण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात

ऊस दराच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सातारा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानीसह सर्व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ४,५०० रुपयांची पहिली उचल देण्यात यावी, ही शेतकरी संघटनांची प्रमुख मागणी आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीला मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार नितीन पाटील, आमदार धैर्यशील कदम आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील हे प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत. बैठकीसाठी शेतकरी संघटनांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले असून, या बैठकीतून काय तोडगा निघणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

घाबरायचे नसते, त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचा असतो - गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला

शत्रू कितीही मोठा असला, तरी घाबरायचे नसते, त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचा असतो, अशा शब्दांत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटलांना टोला लगावला. तसेच, प्रत्येकाच्या आयुष्यात वेढा पडतो; पण घाबरायचे नसते. मग तो राजकीय असेल किंवा आर्थिक असेल. वेढा कितीही पडला, तरी बाहेर कसे पडायचे, हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायचे, असे विधानदेखील पडळकर यांनी चक्क जयंत पाटलांच्या उपस्थितीत केले. भाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची छाटलेली बोटे, यांचा इतिहास सांगताना पडळकर यांनी हे विधान केले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष पाहायला मिळाला होता.

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट; 10 हजारांचा बोनस जाहीर

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर आनंदाची बातमी आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ऊस आंदोलन स्थगित करा; हसन मुश्रीफांची राजू शेट्टींना विनंती

ऊस आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजू शेट्टी यांनी सुरू असलेले आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती त्यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या माध्यमातून केवळ कोल्हापूर जिल्ह्याला वेठीस धरत असल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केला.

एसटी कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये दिवाळी बोनस

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये दिवाळी बोनस दिला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीतच संपाची हाक दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

US Elections Results 2026: पाच भारतीय-अमेरिकन विजयी

अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव

तिकीट तपासनीसाला महिला प्रवाशाचा चावा; ५१० रुपयांच्या दंडावरून वाद


अंधेरी रेल्वे स्थानकात विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये तिकीट तपासणीदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. तिकीट नसल्याने ५१० रुपयांचा दंड आकारल्याच्या रागातून एका महिला प्रवाशाने ४२ वर्षीय तिकीट तपासनीसाच्या हाताचा चावा घेतला आणि ओरखडे काढले. या घटनेमुळे स्थानकात एकच गोंधळ उडाला असून दोषी महिलेवर कारवाई सुरू आहे.

जळगावमध्ये 240 किलोंचा डुप्लिकेट खवा एफडीएने केला जप्त

जळगावमध्ये अन्न अन् औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत तब्बल २४० किलो बनावट (डुप्लिकेट) खवा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या खव्याची बाजारपेठेतील किंमत सुमारे ६५ हजार रुपये आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा भेसळयुक्त खवा अहमदाबादहून आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी जागेवर पंचनामा करण्यात आला असून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

सतेज पाटील यांना उद्धव ठाकरेंचा फोन

गोकुळचा मुद्दा चांगलाच तापला असून काँग्रेस नेते सतेज पाटील यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना आज फोन केला. पाटील यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर लगेच ठाकरेंना त्यांना फोन करत वादग्रस्त मुद्द्यावरून पाठिंबा दिला आहे.

कोल्हापुरात सतेज पाटील मोर्चा काढणार

राज्य सरकारने सहकारी संस्थांमध्ये पाच शासन नामनिर्देशित संचालक नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ गोकुळ दूध संघांमध्ये सत्ता काबीज करण्यासाठीच घेतल्याचा आरोप काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केला आहे. या निर्णयाविरोधात येत्या ९ नोव्हेंबरला कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

ऊस आंदोलन स्थगित करा; हसन मुश्रीफांची राजू शेट्टींना विनंती

ऊस आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजू शेट्टी यांनी सुरू असलेले आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती त्यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या माध्यमातून केवळ कोल्हापूर जिल्ह्याला वेठीस धरत असल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केला.

गोकुळसाठी महाविकास आघाडीनं एकत्र यायला हवं : संजय राऊत

गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीने एकत्र येण्याचं आवाहन ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनमताचा आदर केला नाही, तर त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. गोकुळच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर राऊतांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला वेग आला आहे.

मुख्यमंत्र्यांचा ओएसडी असल्याचे भासवून अकोल्यातील कंत्राटदाराला ३.२५ कोटींचा गंडा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) असल्याचे भासवून अकोल्यातील कंत्राटदाराची तब्बल ३ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील आसिफ इस्माईल पठाण याला मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत असून, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

१८ जागांसाठी ३०९ उमेदवार रिंगणात; माघारीसाठी १७ पर्यंत मुदत

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत तीन उमेदवार बिनविरोध झाल्यानंतर आता १८ संचालकपदासाठी ३०९ उमेदवार रिंगणात आहेत. एकाही उमेदवाराने माघारी घेतली नाही. माघारीसाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. १८ नोव्हेंबरला सकाळी अकराला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हवाटप होईल. कोण कोण उमेदवार माघार घेतो, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

नितीन गडकरी आज उत्तर प्रदेशात

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज उत्तर प्रदेशात आठ नवीन हायवेंचं लोकार्पण आणि शिलान्यास करणार आहेत. जौनपूर येथील मुंगराबादशाहपूरच्या सार्वजनिक इंटर कॉलेजच्या मैदानावर हा समारंभ होणार आहे. 33.77 अब्जाच्या या योजना आहेत. यावेळी नितीन गडकरी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. यावेळी ते 467 कोटींच्या पाच योजनांचं शिलान्यास आणि 3210 कोटींच्या तीन योजनांचं लोकार्पण करणार आहेत.

ST च्या खाजगीकरण व कंत्राटी भरती विरोधात ७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, वेतन निश्चिती, भत्ते, महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी, घरभाडे भत्त्याची थकबाकी आणि इतर आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी तसेच ९८ वर्षे भाडे पट्टयावर जमिनी देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा व कंत्राटी भरती विरोधात ७ नोव्हेंबर, २०२६ पासून महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने बेमुदत संप करण्यात येणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.

शरद पवारांना ब्रीच कँडी रूग्णालयात केलं दाखल

जेष्ठ नेते शरद पवारांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल केलं आहे. कालच त्यांना पुण्यातील रूबी हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.

ठेकेदारसाठी घेतलेला प्रस्ताव प्रशासनाकडून फेटाळला; १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी नव्याने निविदा

परफॉर्मन्स बेस्ट झाडणकामाच्या ठेकेदारांना थेट वर्षभराची मुदतवाढ देण्याचा स्थायी समितीचा निर्णय महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी मान्य करण्यास नकार दिला आहे. स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाला प्रशासनाने मर्यादा घालत ठेकेदारांना केवळ तीन महिन्यांचीच मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या वर्षभराच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाला आयुक्तांनी चाप लावल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

सहकारसम्राटांसाठी दुष्काळ ठरला 'वरदान'

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार, असा प्रश्न उपस्थित झाला असतानाच राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील विद्यमान संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खासदारकी लढवलेला राज ठाकरेंचा जवळचा नेता काँग्रेसमध्ये

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, २००९ मध्ये मनसेच्या उमेदवारीवर पुणे लोकसभा निवडणूक लढविलेल्या शिरोळे यांनी आता काँग्रेसचा हात धरल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ऊस दर आंदोलनामुळे ऐन दिवाळीत परिवहन विभागाचे नियोजन कोलमडलं

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनामुळे ऐन दिवाळीत परिवहन विभागाचे नियोजन कोलमडलं असून आंदोलकांनी महामार्ग बंद केल्यामुळे कोल्हापूरहून पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या 166 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आंदोलनाचा फटका परिवहन विभागाला बसला आहे.

राजू शेट्टी यांचं ऊस दरासाठीचं आंदोलन सुरूच

ऊसाला साडेचार हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरू केलेल्या आंदोलनाला ४० तास उलटून गेले आहेत. आंदोलकांनी पुणे बंगळूरु महामार्ग अडवल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.