Meat sale banned : चिकण-मटण बंदी कायम राहिल्यास सविनय कायदेभंग : आव्हाडांचा सिक्रेट प्लॅन तयार, काँग्रेस, मनसेचाही हातभार

Meat sale banned : स्वातंत्र्यदिनी कत्तलखाना तसेच चिकन आणि मटण विक्री बंद ठेवण्याचा निर्णय सर्वात आधी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने घेतला होता. त्यामुळे याच महापालिका क्षेत्रात सविनय कायदेभंग करण्याचा बेत विरोधकांनी आखला आहे.
NCP leader Jitendra Awhad plans protest feast against meat sale ban on Independence Day in Kalyan-Dombivli.
NCP leader Jitendra Awhad plans protest feast against meat sale ban on Independence Day in Kalyan-Dombivli.Sarkarnama
Published on
Updated on

Independence Day : महाराष्ट्रातील काही महानगरपालिकांनी स्वातंत्र्यदिनी कत्तलखाना तसेच चिकन आणि मटण विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सर्वच स्तरांतून विरोध होत असून, विरोधी पक्षांनी सरकार आणि प्रशासनावर सडकून टीका केली आहे. तर सरकारने हा 1988 मधील आदेश असल्याचे म्हणत या निर्णयापासून हात झटकले आहेत.

दरम्यान, सर्वात आधी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हा निर्णय मागे घेतला नाही, तर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सविनय कायदेभंग करण्याचा बेत विरोधकांनी आखला आहे. 15 ऑगस्टला चिकन आणि मटणची पार्टी करण्याचे नियोजनच विरोधकांनी केले आहे. याचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड करणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनी या निर्णयावरून रणकंदन माजवले आहे. यादरम्यान, आमदार आव्हाड यांनी येत्या 15 ऑगस्टला कल्याण-डोंबिवलीमध्ये जाऊन चिकन मटण खाण्याचे मत बोलून दाखवले होते. त्यानुसार आता विरोधकांनी कल्याण-डोंबिवलीमध्ये चिकन आणि मटणाची पार्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.

NCP leader Jitendra Awhad plans protest feast against meat sale ban on Independence Day in Kalyan-Dombivli.
15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळूनही पाकिस्तानात 14 तारखेला का साजरे करतात? जाणून घ्या राजकीय आणि धार्मिक कारण

या पार्टीचे नेतृत्व आमदार जितेंद्र आव्हाड करणार असून, विरोधी पक्षातील इतर नेतेमंडळी याला उपस्थित राहणार आहेत. या पार्टीसाठी मनसेचे नेते राजू पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनाही आमंत्रित केले असल्याची माहिती आहे. आम्हाला बोलवणे आल्यास आम्ही नक्कीच त्या पार्टीमध्ये सहभागी होऊ. असे काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अॅड. नवीन सिंग यांनी सांगितले.

NCP leader Jitendra Awhad plans protest feast against meat sale ban on Independence Day in Kalyan-Dombivli.
79 Indepedence Day : 15 ऑगस्टला पुन्हा फडकणार तिरंगा; कसा उभारला गेला वैभवशाली लाल किल्ला?

काँग्रेसचाही हातभार :

हा निर्णय मागे न घेतल्यास महापालिकेत कोंबड्या सोडण्याचा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिला आहे. सचिन पोटे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा इशारा दिला आहे. या निर्णयावर मनसेदेखील आक्रमक झाली आहे. ही बंदी करून आयुक्तांना अभिनव पोल्ट्री फार्म सुरू करायचा आहे का, असा सवाल मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com