Maharashtra Assembly : महाराष्ट्र सरकारकडून आमदारांच्या पगारवाढीचा प्रस्ताव : पीए, वाहनचालकांना होणार लाभ; फाईल अर्थ खात्याकडे

Maharashtra News : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सध्या एकीकडे वेगवान राजकीय घडामोडी घडत आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सध्या एकीकडे वेगवान राजकीय घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे विधिमंडळातील आमदारांच्या पीए आणि वाहनचालकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे येत्या याकाळात आमदारांच्या पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचे मानधन चाळीस हजार रुपये, तर वाहनचालकांचे मानधन 30 हजार रुपये होणार आहे. पगारवाढीचा प्रस्ताव असेलली फाईल अर्थ खात्याकडे गेली असल्याचे समजते.

राज्यातील आमदारांच्या पीए आणि वाहनचालकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसापासून राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. वाढती महागाई, मतदारसंघातील वाढलेली कामे आणि प्रशासकीय खर्च लक्षात घेऊन आमदारांच्या वेतन आणि विविध भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत होती. त्यानुसार संसदीय कामकाज विभागाने संबंधित प्रस्ताव तयार करून तो अर्थ विभागाकडे पाठवला आहे. त्याबाबत बुधवारी संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील (Chandarkant Patil) यांनी माहिती दिली. त्यामुळे आता लवकरच पगारवाढ होणार असल्याचे समजते.

Chandrakant Patil
Maharashtra News Live Update : सीएनजीच्या दरात 1 रुपये आणि पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ

राज्य विधिमंडळातील आमदारांच्या स्वीय सहाय्यक (पीए) आणि वाहनचालकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला असून, प्रस्तावातील सर्व त्रुटी दूर करून फाईल वित्त विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यामुळे आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचे मानधन चाळीस हजार रुपये, तर वाहनचालकांचे मानधन 30 हजार रुपये होणार आहे.

Chandrakant Patil
Maharashtra News Live Update : सीएनजीच्या दरात 1 रुपये आणि पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ

या प्रस्तावात केवळ आमदारांच्या वेतनवाढीचाच समावेश नसून, त्यांच्या कार्यालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वैयक्तिक सहाय्यक (पीए) आणि वाहनचालकांच्या मानधनातही वाढ करण्याचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांनाही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Chandrakant Patil
Maharashtra Politics Live Update : मोहोळचे आमदार राजू खरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना पाठिंबा

या संदर्भातील प्रस्तावाची फाईल सध्या राज्याच्या अर्थ विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता अर्थ विभागाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थ विभागाची संमती मिळाल्यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवला जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यास आमदारांसह त्यांच्या पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Chandrakant Patil
Maharashtra News Live Update : खरात प्रकरणात मोठी अपडेट; शिर्डी पोलिसांनंतर आता ईडी प्रतिभा चाकणकरांची चौकशी करणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com