Maharashtra MLC Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची अंतिम यादी तयार : तीन मतदारसंघातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब

Maharashtra vidhan parishad Election News : भाजपच्या वाट्याला आलेल्या विधानपरिषदेच्या तीन जागांवरील उमेदवाराची यादी घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दिल्लीला गेले आहेत.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumabi News : विधानपरिषदेच्या पाच जागेसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होत आहे. त्यामध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ तर पुणे व अमरावती शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. भाजपच्या वाट्याला आलेल्या विधानपरिषदेच्या तीन जागांवरील उमेदवाराची यादी घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दिल्लीला गेले आहेत. त्याठिकाणी तीन मतदारसंघातील उमेदवारांची नावे फायनल करण्यात येणार असून ही यादी शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर केली जाणार आहे.

महायुतीमधील जागावाटपात भाजपकडे (BJP) पुणे, नागपूर, पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघ आला आहे तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. तर अमरावती शिक्षक मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे आता जागावाटप जवळपास फायनल झाले असल्याने हालचालींना वेग आला आहे.

भाजपच्या वाट्याला आलेल्या तीन मतदारसंघातील इच्छुकांची यादी घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे शनिवारी सकाळी दिल्लीला गेले आहेत. याठिकाणी भाजपच्या हायकमांडसोबत त्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या समवेत चव्हाण यांची बैठक होणार आहे. या बैठकीत तीन मतदारसंघातील उमेदवारांची नावे फायनल करण्यात येणार असून त्यानंतर ही यादी शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर केली जाणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून शरद लाड यांचं नाव जवळपास फायनल झाले आहे. शुक्रवारी अचानक एका महिला नेत्याचा शोध भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातून घेतला जात होता. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात लाड की धक्कातंत्र याबाबत दोन दिवसांपासून चर्चा होती.

नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असताना गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार निवडताना कस लागला होता. आता भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. माजी आमदार अनिल सोले यांच्याही नावाची चर्चा होती.

पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपकडून कौस्तुभ गावडे गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करीत आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदाराची नोंदणी केल्याचे सांगितले जाते. शिक्षण महर्षि बापुजी साळुंखे शिक्षण संस्थेचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम बघत आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनीही गावडे यांच्या उमेदवारीसाठी शब्द टाकला होता. आता गावडे यांच्या नावाची घोषणा होणार हे निश्चित मानले जाते. गावडे यांच्याशिवाय भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश संयोजक जितेंद्र पवार, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रा. भगवानराव साळुंखे ही नावेही चर्चेत होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com