Sharad Pawar : राज्यसभेसाठी केलेल्या मदतीची शरद पवारांकडून परतफेड, उद्धव ठाकरेंबाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाले, 'जे नाव...'

MLC election Maharashtra News : महाविकास आघाडीतील घटक पक्षात या तीन जागेसाठी जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत असतानाच, या निवडणुकीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात राज्यात विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षात रस्सीखेच दिसून येत आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता नऊ जागेपैकी महायुतीच्या वाट्याला आठ जागा येणार आहेत तर एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षात या तीन जागेसाठी जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत असतानाच, या निवडणुकीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेल्या एकमेव जागेवर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पाठींबा दिला. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले. त्यानंतर शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आगामी काळात होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. येत्या काळात विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील त्याला आमच्या पक्षाचा पाठिंबा असेल, असे स्पष्ट केले.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Rajya Sabha Election Analysis : राज्यसभा निवडणूक बिनविरोध, उमेदवार निवडीमागे काय राजकारण? शरद पवार, ज्योती वाघमारेंमुळे अनेकांना धक्का!

महाविकास आघाडीतील (MVA) तीन घटक पक्ष एकत्रित आहेत. त्यामुळे येत्या काळात तीन पक्ष मिळूनच निवडणुकीविषयी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच राज्यसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्यानंतर रविवारी दिल्लीला रवाना होत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
MVA Rajya Sabha: 'मविआ'कडून शरद पवारांना राज्यसभेसाठी उमेदवारी, 'मातोश्री' अन् 'दिल्ली'हून 24 तासांतच सूत्रं फिरली; 4 कारणं ठरली महत्त्वाची?

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेल्या मदतीची शरद पवार यांच्याकडून येत्या काळात परतफेड केली जाणार, अशी चर्चा रंगली आहे. त्यातच पुढ्यच महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेच्या आमदारकीची मुदत संपत असल्याने महाविकास आघाडीकडून येत्या काळात काय निर्णय घेतला जाणार? याची उत्सुकता लागली आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
MVA Sharad Pawar Strategy : उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठीही 'शरद पवार' पॅटर्न ? काँग्रेसवर पुन्हा 'शांत' राहण्याची नामुष्की

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com