Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची कोंडी! काँग्रेसच्या अटीमुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली

Harshvardhan Sapkal News : महाविकास आघाडीच्या वाट्याला येत असलेल्या एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाकडून केली जात आहे. निवडणुकीची अधिसूचना आजपासून जारी झाली असल्याने उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस ३० एप्रिलला आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या वाट्याला येत असलेल्या एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टर्म संपत असल्याने ते निवृत्त आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी यासाठी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आग्रही असल्याचे दिसत आहे.

विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या नऊ जागासाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असल्याने वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीच्या गोटात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामुळेच आता आघाडीकडून भेटीगाठीवर भर दिला जात आहे. गुरुवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Uddhav Thackeray
Rajya Sabha Election Analysis : राज्यसभा निवडणूक बिनविरोध, उमेदवार निवडीमागे काय राजकारण? शरद पवार, ज्योती वाघमारेंमुळे अनेकांना धक्का!

यावेळी सपकाळ यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच विधानपरिषदेची निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची कोंडी झाली आहे. ठाकरे हे निवडणूक लढणार नसतील तर ही जागा काँग्रेसला सोडण्यात यावी या मागणीवर काँग्रेस ठाम आहे. दुसरीकडे सपकाळ यांच्या या भूमिककेमुळे काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत इकचुक असलेल्या नेत्याची धाकधूक वाढली आहे.

Uddhav Thackeray
Sharad Pawar : विधानपरिषद निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच शरद पवारांचा 'मास्टरस्ट्रोक : उद्धव ठाकरेंबाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाले, 'आमच्या पक्षाचा...'

त्यासोबतच येत्या काळात महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा आहेत. त्यामुळे त्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
MLC election 2026 : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट? उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीबाबत सस्पेंस कायम! हर्षवर्धन सपकाळ, संजय राऊत ठाकरेंच्या भेटीला

दरम्यान, विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरे लढविणार का यावरून सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे निवडणूक लढविणार नसतील तर ती जागा काँग्रेसला सोडावी या मागणीवर काँग्रेस ठाम असून त्यासाठीच उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट घेतली तर दुसरीकडे ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील ठाकरेंची भेट घेतली.

Uddhav Thackeray
Sharad Pawar : विधानपरिषद निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच शरद पवारांचा 'मास्टरस्ट्रोक : उद्धव ठाकरेंबाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाले, 'आमच्या पक्षाचा...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com