Online Savkari License : सावकारी परवान्यासाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे थांबणार; आता परवाना थेट ऑनलाइन! अर्ज करण्याची सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

Maharashtra moneylending license online application step by step : सावकारी परवान्यासाठी आता ऑनलाइन अर्ज करता येणार? अर्ज करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि परवान्यासंबंधी महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
Online Savkari License
Online Savkari LicenseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : नवीन सावकारी परवाना मिळवायचा असो किंवा जुन्या परवान्याचे नूतनीकरण करायचे असो, त्यासाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारणे, कागदपत्रांची जुळवाजुळव करणे आणि अर्जाच्या प्रक्रियेत अडकून पडणे, या त्रासातून आता सुटका होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने सहकार विभागाच्या सेवा ऑनलाइन करण्याच्या दिशेने पाऊल उचलले असून, नवीन सावकारी परवाना आणि परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया आता डिजिटल होणार आहे. त्यामुळे अर्जदारांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करण्यासह डिजिटल स्वाक्षरी असलेला परवाना मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

कागदपत्रांसाठी वारंवार मागणी नको!

सावकारी परवान्यासाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे हा महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र, विविध विभागांकडे उपलब्ध असलेली माहिती पुन्हा-पुन्हा सादर करण्याची गरज कमी करण्यावर शासनाचा भर आहे. राष्ट्रीय सहकारी डेटाबेस, ग्रिस्टॅक, डिजिलॉकर आणि भूमिअभिलेख विभागाच्या डिजिटल प्रणालींमध्ये उपलब्ध असलेली माहिती स्वयंचलित पद्धतीने मिळवण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

Online Savkari License
Buldhana FDA Raid : बुलढाण्यात FDA ची मोठी कारवाई! 1 कोटींचा मसाला जप्त; 2 व्यावसायिकांचे परवाने निलंबित, प्रशासनाच्या धाडीने एकचं खळबळ!

अर्जासोबत द्यावी लागणारी स्वयंघोषणापत्रेही आधार संलग्न ओटीपीच्या माध्यमातून ई-संमती घेऊन स्वीकारली जाणार आहेत. त्यामुळे कागदपत्रांची पुनरावृत्ती कमी होण्याबरोबरच अर्ज प्रक्रियेत सुलभता येण्याची अपेक्षा आहे.

मैत्री पोर्टलवरून मिळणार परवाना

नवीन सावकारी परवाना मिळवणे, तसेच जुन्या परवान्याचे नूतनीकरण करणे या दोन्ही सेवा मैत्री पोर्टलद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून (महाआयटी) ऑनलाइन प्रणाली विकसित केल्यानंतर या सेवांची अंमलबजावणी होणार आहे.

या प्रक्रियेत अनावश्यक प्रशासकीय टप्पे कमी करून अर्जदारांना अधिक पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, ऑनलाइन सेवा प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर अर्जाची पडताळणी, मंजुरी आणि परवाना मिळण्यास लागणारा कालावधी किती कमी होतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

केवळ अर्ज ऑनलाइन नव्हे, तर परवानाही डिजिटल!

या नव्या व्यवस्थेत अर्जदारांना डिजिटल स्वाक्षरीसह प्रमाणपत्रे आणि परवाने ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे परवान्यांसाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची गरज कमी होऊ शकते. सहकार विभागाच्या विविध सेवा डिजिटल करण्याच्या व्यापक प्रक्रियेतील सावकारी परवान्याची सेवा हा महत्त्वाचा भाग ठरणार आहे.

Online Savkari License
IAS officers transfer : प्रशासनात मोठा फेरबदल! हिमाचल प्रदेशमध्ये 4 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाकडे कोणती जबाबदारी?

आता अंमलबजावणीची प्रतीक्षा

सहकारी संस्था नोंदणी, उपविधी दुरुस्ती, गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण आणि साखर कारखान्यांचे गाळप परवाने अशा सहा सेवा ऑनलाइन करण्याचे नियोजन आहे. यामध्ये सावकारी परवाना आणि त्याचे नूतनीकरण या सेवांचाही समावेश आहे. महाआयटीकडून प्रणाली विकसित झाल्यानंतरच या सेवांचा प्रत्यक्ष लाभ अर्जदारांना घेता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com