Maharashtra monsoon update : सरकारने दिली शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका...

⁠Farmers sowing advisory, Maharashtra agriculture news : विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहनही सरकारने केले आहे.
IMD weather alert (AI image)
IMD weather alert (AI image)Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Government news : भारतीय हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच देशातील जून महिन्यातील पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असणार आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी अपडेट दिली आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्राच्या बहुतांश भागात किमान १० जुनपूर्वी मान्सूनचे आगमन होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे आणि १ जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतर ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

IMD weather alert (AI image)
Modi Government : विरोधकांना जे जमलं नाही, ते 17-18 वर्षांच्या पोरांनी करून दाखवलं; मोदी सरकार पहिल्यांदाच बॅकफुटवर

शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.

IMD weather alert (AI image)
Congress vs BJP : केरळ काबीज करणाऱ्या काँग्रेसला जोरदार झटका; सत्ता असलेल्या दुसऱ्या राज्यात भाजपचा बंपर विजय

⁠विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com