Maharashtra municipal elections: अखेर सर्व 29 महापालिकांमध्ये महापौर विराजमान : मुंबईसह सर्वाधिक महापालिकांवर भाजपचा झेंडा : शिंदे, ठाकरे, काँग्रेसच्या वाट्याला किती?

Maharashtra mayor election News : राज्यातील 29 महानगरपालिकांची निवडणूक पार पडली. काही ठिकाणी महापौर निवडीवेळी शेवटच्या क्षणापर्यंत मोठी रस्सीखेच पाहावयास मिळाली.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला या वर्षाच्या सुरुवातीलाच मुहूर्त लागला होता. पहिल्या टप्प्यात राज्यातील 288 नगरपालिका व नागरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर 29 महापालिका निवडणुकीचा बार उडाला. त्यानंतर गेल्या महिनाभरात सर्वच ठिकाणी महापौर विराजमान झाले आहेत. त्यामुळे आता सर्वच महापालिकेतील चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार आता सर्वाधिक 20 महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे महायुतीचे 24 महापौर निवडून आले आहेत. विरोधी पक्षाचे केवळ पाच ठिकाणी महापौर निवडून आले आहेत.

राज्यातील 29 महानगरपालिकांची निवडणूक पार पडली. काही ठिकाणी महापौर निवडीवेळी शेवटच्या क्षणापर्यंत मोठी रस्सीखेच पाहावयास मिळाली. शेवटच्या टप्प्प्यात झालेल्या महापौर पडलाय निवडीत ऐनवेळी एकामताने चंद्रपूर महापालिकेत भाजपचा महापौर झाला तर भिवंडीत काँग्रेसच्या पाठींब्यावर भाजपचा (BJP) बंडखोर महापौर झाला आहे. शेवटच्या क्षणापर्यत त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली होती.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
BJP Nominated Corporator : सोलापूर भाजपच्या बहुचर्चित स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर; शहराध्यक्षांसह पाच निष्ठावंतांना संधी

राज्यातील सर्व महापालिकांमधील महापौरपदाची निवड झाली असून, सर्वाधिक 20 महापौर हे भाजपचे निवडून आले आहेत. शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे तीन तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे महायुतीचे 24 महापौर निवडून आले तर काँग्रेस व ठाकरे गटाला प्रत्येकी एक महापौरपद मिळाले आहे. तर भिवंडीत काँग्रेसच्या मदतीने भाजप बंडखोर महापौर झाला तर वसईत हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी व मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा महापौर झाला आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde : 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' या भूमिकेमुळेच शिवसेचं नुकसान; मुख्यमंत्री शिंदेंची टीका

एकनाथ शिंदेंचा पक्ष ठाण्यातच मर्यादित

महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यात दुसरा क्रमांक पटकविला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर अशा ठाणे जिल्ह्यातील तीन महानगरपालिकांमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे महापौर निवडून आले. शिंदे गटाला राज्यात अन्यत्र कुठेही महापौरपद मिळालेले नाही. भिवंडीत सत्तेसाठी अंकगणित जुळवून आणण्याचा शिंदे प्रयत्न करीत असताना भाजपने त्यात खो घातल्याचा आरोप शिंदे गटाकडून होत आहे. तर महायुतीमधील मैत्र पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अहिल्यानगरचे महापौरपद मिळाले आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Congress MLAs Tour : नेतृत्व बदलाच्या वादळात २१ आमदार थेट परदेश दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण

दुसरीकडे विरोधी पक्षातील काँग्रेसचा लातूरमध्ये महापौर विराजमान झाला. चंद्रपूर व भिवंडीमध्ये सर्वाधिक जागा मिळूनही काँग्रेसला महापौरपद मिळू शकले नाही. चंद्रपूरमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेसला धक्का दिला. पण परभणीमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेला मदत करून काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
NCP Politic's : राष्ट्रवादी नेत्याच्या गुगलीने भाजपचं टेन्शन वाढवलं; ‘निवडणूक काळात साथ दिलेल्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करावी’

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले होते. यापाठोपाठ सर्वाधिक महापौर भाजपचे निवडून आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या 12 जिल्हा परिषदांमध्येही अधिक अध्यक्षपदे जिंकण्यासाठी भाजपने आतापासूनच जोर लावला आहे. त्यामुळे आता सर्वाधीक जिल्हा परिषदेवर कोणाचे वर्चस्व असणार याची उत्सुकता शिगेला पोंहचली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Shivsena VS BJP : शिवसेना नेत्याचा भाजपवर मोठा आरोप; 25 लाख देऊन राष्ट्रवादी नगरसेवकाला फोडले

पक्षनिहाय महापौर निवडून आलेल्या महानगरपालिका पुढीलप्रमाणे :

भाजप : मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, जालना, इचलकरंजी, नाशिक, धुळे, जळगाव, मीरा-भाईंदर, पनवेल, नांदेड-वाघाळा, सांगली-मिरज-कुपवाड, एकनाथ शिंदेची शिवसेना : ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, राष्ट्रवादी अजित पवार : अहिल्यानगर, काँग्रेस : लातूर, उद्धव ठाकरेंची शिवसेना : परभणी, बहुजन विकास आघाडी : वसई, इस्लाम पार्टी : मालेगाव, भाजप बंडखोर : भिवंडी-निजामपूर.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Shiv Jayanti 2026 : पुण्यातील शिवभक्तांसाठी मोठी बातमी! महापौर मंजुषा नागपुरेंच्या आदेशानंतर मिरवणूक मार्गात बदल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com