hung municipal corporations: महापौरपदासाठी भाजप ठाकरेंसोबत, काँग्रेस शिंदेंसोबत, शिंदे वंचितसोबत तर एमआयएम.... डोकं बधीर करणारं आघाड्याचं समीकरण

Maharashtra municipal election results News : शिवसेनेसोबत आणि दुसऱ्या ठिकाणी शिंदे वंचित सोबत हा‍तमिळवणी करत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे येत्या काळात कुठे, कोण कोणासोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mahayuti Vs MVA; CM devendra fadnavis, DCM Ajit Pawar, Eknath Shinde, Sharad Pawar uddhav thackeray And harshwardhan sapkal
Mahayuti Vs MVA; CM devendra fadnavis, DCM Ajit Pawar, Eknath Shinde, Sharad Pawar uddhav thackeray And harshwardhan sapkalsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील 29 महापालिकेचे निकाल जाहीर झाले आहेत. बोटावर मोजण्या इतक्या नगरपालिकेत एका पक्षाला बहुमत दिले आहे तर काही ठिकाणी महायुती अथवा आघाडीला बहुमत दिले आहे. दुसरीकडे मात्र मतदारांनीच काही ठिकाणी एका पक्षाला बहुमत न देता बुचकाळ्यात टाकणारा कौल दिला आहे. त्यामुळे आता येत्या काळात महापौर पदासाठी कोणता पक्ष कोणासोबत जाणार हे डोकं बधीर करणारं आघाड्याचं समीकरण सोडवताना राजकीय पक्षांची घालमेल वाढली आहे.

त्यातच आता काही महापालिकांतील त्रिशंकू निकालामुळे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळेच आता राज्यातील वेगवेगळ्या महापालिकांमधील अभद्र युती व आघाड्या होणार यावर भविष्य अवलंबुन आहे. एका महापालिकेत भाजप आणि उद्धव ठाकरेंची युती होण्याची शक्यता आहे. तर एका ठिकाणी काँग्रेस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आणि दुसऱ्या ठिकाणी शिंदे वंचित सोबत हा‍तमिळवणी करत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे येत्या काळात कुठे, कोण कोणासोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई, ठाणे व कल्याण डोबिवलीत भाजप (BJP) व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची महायुती झाली होती. या तीन ठिकाणीही महायुतीची एकत्रित सत्ता आली आहे. मात्र, या तीन ठिकाणी दोन्ही पक्षाकडून केल्या जात असलेल्या दाव्यामुळे या ठिकाणी पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या तीन ठिकाणी दोन्ही पक्षाची सत्ता येणार की स्वबळावर या ठिकाणी सत्ता स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mahayuti Vs MVA; CM devendra fadnavis, DCM Ajit Pawar, Eknath Shinde, Sharad Pawar uddhav thackeray And harshwardhan sapkal
BJP Malegaon : बलाढ्य भाजपला मालेगावात फक्त दोनच जागा जिंकता आल्या, कोणी केली गद्दारी?

कोल्हापूरात काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याची चर्चा

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले काँग्रेस (Congress) आणि शिंदेची शिवसेना महापौर पदासाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांनी याबाबत बोलताना पडद्यामागे महत्त्वाची काय सुरू असल्याची माहिती दिली. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे 34 आणि शिंदेंचे 15 नगरसेवक एकत्र आल्यावर सत्ता स्थापन करणे शक्य असल्याने या युतीबाबत आता बैठकांना वेग आला आहे.

Mahayuti Vs MVA; CM devendra fadnavis, DCM Ajit Pawar, Eknath Shinde, Sharad Pawar uddhav thackeray And harshwardhan sapkal
Shivsena Politics : युतीचा फॉर्म्युला जाहीर! शिवसेनेचा वरचष्मा, भाजपच्या वाट्याला फक्त 2 जागा, इच्छुकांमध्ये असंतोष

भाजप अन् उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार?

चंद्रपूर महापालिकेत जो आमचा महापौर करेल आम्ही त्याच्यासोबत जायला तयार असल्याचे विधान शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी केले. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात बैठक झाल्याचे समजते. शिवसेनेच्या या ऑफरमुळे काँग्रेसवर दबाव वाढू शकतो. ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत गेल्यास काँग्रेसचा हाता-तोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावण्याची शक्यता आहे.

66 सदस्य असलेल्या महापालिकेमध्ये भाजपचे 23 तर शिवसेनेचा एक असे मिळून युतीचे 24 संख्याबळ आहे. तर काँग्रेसचे 27 व भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे 3, सदस्य असल्याने काँग्रेसचे संख्याबळ 30 आहे. तर दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी 34 ही मॅजिक फिगर आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना 6, वंचित बहुजन आघाडी 2, अपक्ष 2 तर बसप व एमआयएमकडे प्रत्येकी एक नगरसेवक आहे. भाजपला 10 तर काँग्रेसला 4 जागांची गरज आहे.

उल्हासनगरमध्ये वंचितमुळे शिंदेच्या शिवसेनाचा महापौर होण्याची शक्यता

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ हे 40 वर गेले आहे तर भाजपकडे 37 नगरसेवक आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका सुरेखा सोनवणे आणि विकास खरात यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेला पाठिंबा देत पत्र सुपूर्द केले. त्यामुळे त्याठिकाणी शिंदेचा महापौर झाल्यास उपमहापौर वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Mahayuti Vs MVA; CM devendra fadnavis, DCM Ajit Pawar, Eknath Shinde, Sharad Pawar uddhav thackeray And harshwardhan sapkal
NCP Unity Talks : महापालिका निवडणुकीत 'पानिपत', आता जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मालेगावमध्ये एमआयएम आणि इस्लाम पार्टी एकत्र येणार?

मालेगावात मोठी राजकीय घडामोड घडत आहे. एमआयएमने इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची तयारी सुरु केली आहे. जातीयवादी पक्ष व शक्तींना रोखण्यासाठी ही युती होण्याची शक्यता आहे. तर सेना-भाजपसोबत सत्ता स्थापन करणार नसल्याचे एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी स्पष्ट केले. मालेगाव पालिकेत एकूण 84 जागा आहेत. इस्लाम पार्टी 35, समाजवादी पार्टी 6, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) 18, एमआयएम 20, काँग्रेस 3, भाजप 2 असे संख्याबळ आहे. त्यामुळे आता शहराच्या विकासासाठी इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी व काँग्रेससोबत युती करण्याचे संकेत मुफ्ती इस्माईल यांनी दिले आहेत. त्यामुळे याठिकाणी काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Mahayuti Vs MVA; CM devendra fadnavis, DCM Ajit Pawar, Eknath Shinde, Sharad Pawar uddhav thackeray And harshwardhan sapkal
Sangali Congress : चंद्रकांतदादांनी काँग्रेसला अक्षरशः मोकळं केलं... पण सांगलीत विश्वजित कदम, विशाल पाटलांनी पक्ष सावरला : बहुमत गाठताना भाजपची दमछाक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com