Shivsena Politics : ऐन निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हायहोल्टेज ड्रामा! पक्षातून कार्यकर्त्याची हकालपट्टी करताच माजी महापौरांनी दिला राजीनामा

Shivsena leader Minakshi Shinde Resignation : ठाण्यातील भूषण भुईरे या माजी नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळू नये यासाठी शिवसेनेच्या शाखाप्रमुखांनी आंदोलन केलं होतं.
Shiv Sena leader Minakshi Shinde resignation
Shivsena leader Minakshi Shinde ResignationSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 26 Dec : एकीकडे आपल्या पक्षाची ताकद वाढावी यासाठी एकनाथ शिंदे शिवसेनेत जोरदार इनकमिंग होण्याकडे लक्ष देत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच बालेकिल्ल्यातील महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदेंनी पदाचा राजीनामा दिला.

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. मिनाक्षी शिंदे यांनी त्यांचे कट्टर समर्थक विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवाय राजीनामा दिल्यानंतर त्या काल ठाण्यातील शिवसेनेच्या शाखेत जाऊन बसल्या होत्या.

विक्रांत वायचळ यांची हकालपट्टी का केली?

ठाण्यातील भूषण भुईरे या माजी नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळू नये यासाठी शिवसेनेच्या शाखाप्रमुखांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात विक्रांत वायचळ हे देखील होते. मात्र, या शाखाप्रमुखांवर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मनोरमा नगरचे शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

Shiv Sena leader Minakshi Shinde resignation
Prashant Jagtap : काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या प्रशांत जगतापांना उद्धव ठाकरेंचा फोन, शिवसेनेच्या ऑफरवर म्हणाले, '2 ते 3 तासांत भाजपला आव्हान देणाऱ्या पक्षातच...'

मात्र, आपल्या समर्थकावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी मिनाक्षी शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्या म्हणाल्या, 'माझ्या कार्यकर्त्याचा राजीनामा घेतला, पण हे करण्यापूर्वी मला कळवलं असतं तर मी भूमिका घेतली असती. प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणुकीला उभे राहावे असे वाटते. त्याने तशी इच्छा व्यक्त करणे हा गुन्हा नाही.

एखाद्या कार्यकर्त्याने तिकीट मागितल्यानंतर पक्षश्रेष्ठींना मान्य असेल तर ते तिकीट देतात. पण कोणी इच्छा व्यक्त केली म्हणून राजीनामा घेणे चुकीचे आहे.' शिवाय मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असून पुढील निर्णय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलून घेईन. तसंच माझ्या राजीनाम्याने ठाण्यातील महापालितेच्या निवडणुकीच्या तयारीवर कोणताही परिणाम होणार नाही.

Shiv Sena leader Minakshi Shinde resignation
Maharashtra Politics : हिवाळी अधिवेशना दरम्यान फडणवीसांची भेट, पण प्रवेश शिंदेंच्या शिवसेनेत; मनसेला रामराम केलेल्या महाजनांनी अखेर आपला मार्ग निवडला

राजीनामा दिला असला तरी शिवसेनेसोबतच आहे, मी शिवसेनेचीच कार्यकर्ता राहीन, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता मिनाक्षी शिंदेंच्या भूमिकेवर पक्ष काय भूमिका घेणार? विक्रांत वायचळ यांना पुन्हा पक्षात घेणार की शिंदेंची मागणी अमान्य करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com