Mumbai News, 13 Jan : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचार सभेतून ठाकरे बंधुंनी भाजपवर जोरदार हल्लोबोल केला. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या रविवारी मुंबईत झालेल्या संयुक्त सभेत बोलताना आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची नक्कल करत टीका केली होती.
आदित्य यांच्या याच टीकेला मुंबईत सोमवारी (ता.12) पार पडलेल्या महायुतीच्या जाहीर सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधुंवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या नक्कलवरून आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनाही टोला लगावला.
कालच्या सभेत आदित्य ठाकरेंनी केलेल्या नक्कलवरून बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. पण माझी कोणी नक्कल केली तर मला मजा येते. त्यामुळे मला काही अडचण नाही. मात्र, त्यांना समजायला पाहिजे की नक्कल करता-करता काकाच्या पक्षाची काय अवस्था झाली?
काकाला किमान चांगली नक्कल तरी करता येते, चांगलं भाषण करता येतं. पण तुम्हाला ते पण येत नाही. तुमची काय अवस्था होईल? हे एकदा मागे वळून पाहा", असं म्हणत फडणवीसांनी काका राज आणि पुतण्या आदित्य यांना टोला लगवाला.
दरम्यान, याच भाषणात ठाकरेंनी उद्योगपती गौतम अदानींच्या गुंतवणुकीवरून केलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, "मराठी मुलांना रोजगार देण्यासाठी उद्योगपतींचे मोठ्या प्रमाणातील गुंतवणुकीचे महाराष्ट्रात स्वागत केले तर त्यात गैर काय? 'तुमचं बरं आहे भाषणं द्यायची आणि मराठी माणसाला फक्त वडापावची गाडी द्यायची. आम्हाला मराठी मुलांच्या डोळ्यांतील स्वप्ने पूर्ण करायची आहेत. त्यांना रोजगारासोबत उद्योगपतीही बनवायचं आहे.
शिवाय अदानींनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांची सरकारने असलेल्या राज्यांमध्येही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे इतर सर्व राज्ये वेडी आहेत का? जर उद्योजकांना गुंतवणकीला नाकारले तर गुंतवणूक दुसरीकडे जाईल. मग आमच्या मुलांना काम कसे मिळेल? असा सवाल करत फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.