Maharashtra politics : महाराष्ट्राच राजकारण 360 डिग्रीने बदलणार; BMC निवडणुकीत मोठा राजकीय प्रयोग? मनसेच्या बैठकीकडे लक्ष

Political experiment in Mumbai News : येत्या काळात होत असलेल्या BMC निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसे मोठा राजकीय प्रयोग? करण्याची शक्यता आहे.
devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeraysarkaranama
Published on
Updated on

Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका तोंडावर आल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात सध्या वेगवान घडामोडी घडत आहे. दसऱ्या मेळाव्यानंतर आरोप-प्रत्यारोप केले जात असतानाच नेतेमंडळीच्या गाठीभेटीने वातावरण ढवळून निघाले आहे. लोणीतील शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्यासोबतच सीएम देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिकच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले तर रविवारी दिवसभरात राज व उद्धव ठाकरे दोनदा भेटले.

त्यासोबतच मातोश्रीवर बंद दाराआड उद्धव-राज ठाकरेंची चर्चा झाल्याने महाराष्ट्राच राजकारण आता 360 डिग्रीने बदलणार आहे. येत्या काळात होत असलेल्या BMC निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसे मोठा राजकीय प्रयोग? करण्याची शक्यता आहे. त्याबाबत उद्या मनसेच्या बड्या नेत्यांची बैठक कृष्णकुंजवर होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांत जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. त्यासाठीची तयारी गेल्या सहा महिन्यापासून केली जात आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून एकसंध शिवसेनेची (Shivsena) सत्ता होती ते खेचण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखली आहे. त्यासाठी त्यांनी महायुतीमधील एकनाथ शिंदेची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस पहावयास मिळणार आहे.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
Uddha Thackeray : मोदींना आव्हान, फडणवीसांना इशारा अन् शिवसैनिकांना आदेश; उद्धव ठाकरे काय म्हणाले?

दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या घडीला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या भाजपला (Bjp) चॅलेंज करतील असे पक्ष राहिले नाहीत. त्यामुळे विरोधकांमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. या काळात ही पोकळी दोन ठाकरे भाऊ एकत्र आले तर भरुन निघण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गेल्या तीन महिन्यात राज-उद्धव ठाकरे पाचवेळा भेटले आहेत.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
Shivsena UBT Politics: उद्धव ठाकरे यांचे आघाडीचे संकेत महापालिका निवडणुकीत कोणाची अडचण वाढवणार?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसे याबाबतचा मोठा प्रयोग करण्याची शक्यता आहे. हा प्रयोग यशस्वी ठरला तर महाराष्ट्राचे राजकीय समीकरणांमध्ये मोठा फेरबदल घडण्याची शक्यता आहे. राज-ऊधव ठाकरे येत्या काळात एकत्र येत राजकीय युती केली तर महाराष्ट्राचे राजकारण 360 डिग्रीने बदलू शकते. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
Sharad Pawar : दादा का भेटायला आले होते; साहेबांनी थेट सांगून टाकत दूध का दूध पानी का पानी केले

रविवारी मातोश्रीवर बंद दाराआड उद्धव-राज ठाकरेंची पाऊण तास चर्चा झाली आहे. यामध्ये दोन पक्षातील युतीबाबत व जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा झाली असल्याची माहिती सूत्राने दिली. त्यामुळेच आता येत्या काळात होत असलेल्या BMC निवडणुकीत ठाकरे बंधूंची युतीची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघण्याची दाट शक्यता आहे.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
Raj-Uddhav Thackeray: मोठी बातमी! राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्रीवर; बंद दाराआड 40 मिनिटे चर्चा, पडद्यामागे नेमके काय घडतंय?

कृष्णकुंजवर बोलवली उद्या प्रमुख नेत्यांची बैठक

दरम्यान, सोमवारी सकाळी 11 वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या सरचिटणीसासह प्रमुख नेत्यांची बैठक कृष्णकुंजवर बोलवली आहे. या बैठकीत विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
Uddhav Thckeray News : मोदी, शाह महाराष्ट्रात येतात, मणिपूरला का जात नाहीत ? उद्धव ठाकरेंचा घणाघात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com