Solapur News: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीपासून ज्याची सर्वात जास्त भीती ठाकरेंसह पक्षाच्या नेत्याना होती,तेच घडलं आहे. ठाकरेंचे नऊपैकी तब्बल सहा खासदार फुटले आहेत. यानंतर थोड्यात दिवसांत आणखी एका पक्षात राजकीय भूकंप होण्याची संकेत मिळत आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार फुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. याबाबत आता माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे.
उत्तम जानकर म्हणाले, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जातील ना, ते शिवसेनेत कसे जातील. पण मला असं वाटत नाही की, शरद पवारांच्या पक्षात असं काही असेल,असंही जानकर यांनी म्हटलं आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये पक्षाचे जे जे निर्णय होताहेत, पक्षाची जी काही कार्यकर्त्यांविषयीची भूमिका आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गती शरद पवारांचं वय अशा अनेक अडचणींमध्ये पक्ष सापडला आहे. अशा परिस्थितीमध्ये आमच्या पक्षाचे अगदी दहाच आमदार आहेत.त्यामुळे फार मोठी अशी संख्या आहे, असं काही नाही,असंही आमदार उत्तम जानकर यांनी म्हणत राष्ट्रवादी काँग्रैस पक्ष फुटण्यासंदर्भातील चर्चांबद्दलची भूमिकाही स्पष्ट केली.
ज्यांना कुणाला फुटायचं आहे,मला वाटत नाही, त्यांना याची गरज आहे.ऑलरेडी मेजॉरिटी सत्तर ऐंशी टक्के आहेत. मी कुणाची काळजी घ्यायचं काही कारण नाही, कारण राजकारण हे स्वत:च्या कर्तृत्वावर असतं. कुठला पक्ष काळजी घेतो. त्या पक्षातलं कुणी एकमेकांना मदत करतं. जरी पक्ष एकमेकांविरोधात असलो तरी,त्या पक्षातला सहकारी मदत करत असल्याचं जानकर यांनी सांगत एकप्रकारे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनाही टोला लगावला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या कार्यपद्धतीवर व भूमिकेवर गंभीर आक्षेप घेत मोठा राजकीय धक्का दिला आहे.
सोलापूर विधान परिषदेसाठी उत्तमराव जानकरांच्या मुलाचं तिकीट फायनल मानलं जात होतं. पण असं असतानाही मोहिते पाटलांनी जानकरांना धक्का देत ऐनवेळी वसंतराव देशमुखांना उमेदवारी दिली. याचमुळे संतापलेल्या जानकरांनी मोहिते-पाटलांवर थेट विश्वासघाताचा आरोप केला. विधान परिषद निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे
उत्तम जानकरांनी मोहिते-पाटील कुटुंबावर आरोप करताना म्हटले की, "माझ्या मुलाला आमदार होऊ न देण्यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केले आणि माझा केसानं गळा कापला. मोहिते-पाटलांच्या या भूमिकेमुळे दुखावलेल्या जानकरांनी थेट महायुतीच्या नेत्यांची त्यात पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.