

Mumbai News : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असतानाच राज्याच्या राजकरणात गेल्या दोन दिवसापासून पुन्हा एकदा वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी विधानभवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यामुळे चर्चेला उधाण आले होते.
त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारांच्या भेटीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत गाडीतच 30 मिनिटे चर्चा केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात सीएम फडणवीसांसह तीन बड्या नेत्यांमध्ये खलबत झाली. त्यामुळे या बैठकीत काय रणनीती ठरली यावरून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या 15 दिवसातील घडामोडी पाहता राज्याच्या राजकारणात काही तरी मोठे घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यातील नेत्यांचे भेटीगाठींचे हे सत्र पाहता त्यामधून वेगळे संकेत मिळत आहेत. गुरुवारी सकाळी सीएम फडणवीस (devendra fadnavis) यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली. त्या दोंघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर गुरुवारी दुपारी एकनाथ शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत गाडीतच ३० मिनिटे चर्चा केल्याचे समोर आले आहे.
या दोन्ही महत्वपूर्ण भेटींनंतर गुरुवारी दुपारी 3.30 च्या सुमारास विधानभवनातील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात सीएम फडणवीसांसह तीन बड्या नेत्यांमध्ये खलबत झाली. त्यामुळे या बैठकीत काय रणनीती ठरली यावरून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात सीएम फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे चार बडे नेते एकत्र आले होते.
यावेळी नार्वेकर यांच्या दालनात या चार नेत्यांमध्ये मोठी खलबत झाली. त्यामुळे या बैठकीत काय रणनीती ठरली असणार यावरून राजकीय वर्तुळात खल सुरु आहे. या सर्व प्रकारामुळे राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये खळबळ उडाली आहे.
यावेळी सीएम फडणवीस, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण यांची राहुल नार्वेकरांसोबत चर्चा झाली. अधिवेशनकाळातच या चार नेत्यांमध्ये अध्यक्षांच्या दालनात एकत्रित बैठक पार पडली. नेमके या बैठकीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनातील या अचानक आणि गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात संशयाचे वादळ निर्माण झाले आहे. नेमके या बैठकीत काय ठरले याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.