Maharashtra Political Leaders On Film Making : महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांनी एकमेकांवर चित्रपट बनवणार या मुद्द्यावरून राजकीय टीका टीपण्णी होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोका स्टोरी असा चित्रपट शिंदे गटावर बनवणार असल्याचे म्हंटले. यावरून शिंदे गटाकडूनही आता पलटवार सुरू केला आहे. यामुळे महाराष्ट्रात पाॅलिटीकल फिल्लमबाजी सुरू झाली आहे.
डायरी ऑफ महाराष्ट्र खोका सरकार अशा शीर्षकाने सिनेमा बनवणार असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलं. राऊतांच्या या टीकेवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. राऊतांवर सैराट सारखा सिनेमा करावा, आणि त्यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेमसंबंध दाखवावेत, असं प्रत्युत्तर शिरसाटांनी दिली.
संजय शिरसाट यांनी सैराट सिनेमाचा उल्लेख करत राऊतांना प्रत्युत्तर दिल्यानंतर सांगोला मतदारसंघाचे आमदार व शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी ही राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे आता राजकारण्यांनी एकमेकांवर सिनेमे काढण्यावरून टीका-टिपण्णी सुरू आहे.
संजय राऊत म्हणाले की, "डायरी ऑफ महाराष्ट्र खोका सरकार असा आम्ही एक चित्रपट बनवत आहोत. त्यामुळे खोका स्टोरी हा चित्रपट लवकर येईल. विवेक अग्निहोत्री आणि केरला स्टोरीच्या प्रोड्युसरांना याची कथा देणार आहे. खोका स्टोरी जे आहे ती एक मोठा चित्रपट बनेल. उसमे त्यात पात्रे कमी आणि खोका जास्त असतील, असे म्हणत त्यांनी शिंदेंना पुन्हा डिवचलं.
यावर प्रत्युत्तर देताना संजय सिरसाट म्हणाले, संजय राऊत बोलता थोडे चुकले, ते सैराट सारखा चित्रपट काढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे जे प्रेमसंबंध आहेत, ते दाखवणार आहेत. त्याचा अंत आत्महत्येत होणार आहे. यावर राऊतांनी चित्रपट काढला पाहिजे, असा जोरदार पलटवार शिरसाटांनी केला.
तर संजय राऊतांच्या टिकेवर उत्तर देताना सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हंटले की, माकडाच्या हाती कोलीत असा आम्ही चित्रपट काढणार आहे. उद्धव ठाकरेंच्या हातात हे खोलीत दिल्यामुळे पूर्ण महाराष्ट्र पेटला आहे. शिवसेनेचं वाटोळं झालं, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, "संजय राऊत हे डायरी ऑफ दिशा सालीयान हा चित्रपट काढून ते आदित्य ठाकरे यांच्यावरील राग व्यक्त करण्याच्या विचारात आहेत."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.