Supreme Court: मालमत्ता कराबाबत सरकारचा मोठा निर्णय! शैक्षणिक, धार्मिक संस्थांना मिळणार दिलासा

Maharashtra Property Tax: शैक्षणिक, धार्मिक व सेवाभावी संस्थांना मालमत्ता करात सवलत? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र सरकारचे महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी.
Maharashtra Property Tax Supreme Court: order
Maharashtra Property Tax Supreme Court: orderSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: राज्यातील शैक्षणिक, धार्मिक आणि सेवाभावी संस्थांना मालमत्ता करातून सवलत मिळण्याबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाने नुकतेच परिपत्रक जारी केले आहे.

या परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र संस्थांना मालमत्ता कराच्या ओझ्यातून दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धार्मिक, शैक्षणिक आणि सेवाभावी कार्यासाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या इमारतींना मालमत्ता करातून सवलत देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. 'मदर सुपीरियर एडव्हान्स एज्युकेशन कॉन्व्हेंट विरुद्ध केरळ सरकार' या प्रकरणात न्यायालयाने १ मार्च २०२१ रोजी दिलेल्या निर्णयाचा आधार राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार, विशिष्ट धार्मिक, धर्मादाय आणि शैक्षणिक कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या इमारतींना करसवलत देण्याबाबत विचार करण्यात आला होता.

Maharashtra Property Tax Supreme Court: order
Maharashtra Disaster Management: विद्यार्थ्यांसाठी सरकारचा 20 कोटींचा प्लॅन! QR कोड अन् कार्टूनमधून शिकणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

स्थानिक स्वराज्य संस्थांना अंमलबजावणीचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी संबंधित कायदे, प्रचलित नियम आणि शासन निर्णयांमधील तरतुदी तपासाव्यात. त्यानुसार पात्र संस्थांना मालमत्ता करातून सवलत देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे नगरविकास विभागाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयाची अंमलबजावणी केवळ एखाद्या विशिष्ट महापालिकेपुरती मर्यादित नसून राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना लागू असलेल्या सूचनांच्या स्वरूपात हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

Maharashtra Property Tax Supreme Court: order
Maratha Startup Scheme: मराठा-कुणबी तरुणांना दरमहा मिळणार 25 हजार रुपये! स्टार्टअपसाठी अर्ज करा; कोणती कागदपत्रे लागणार?

विधानसभेतही उपस्थित झाला होता मुद्दा

दरम्यान, २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात शैक्षणिक संस्थांना मालमत्ता करातून सवलत देण्याचा विषय विधानसभेत चर्चेला आला होता. त्यावेळी तत्कालीन मंत्र्यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार आवश्यक सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले होते. आता सरकारने परिपत्रक काढल्याने या विषयाला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे.

Maharashtra Property Tax Supreme Court: order
आई-वडिलांसाठी 'वय वंदना' कार्ड काढले का? ज्येष्ठांना १० लाखांचे आरोग्यकवच; खासगी रुग्णालयांतही मोफत उपचार!

सरसकट करमाफी मिळणार नाही

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे पात्र शैक्षणिक, धार्मिक आणि सेवाभावी संस्थांना दिलासा मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, सर्वच संस्थांना सरसकट करमाफी मिळणार नसून संबंधित कायदे, नियम आणि संस्थांची पात्रता यानुसारच प्रत्यक्ष सवलत निश्चित होणार आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांकडून या परिपत्रकाची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते, याकडे संबंधित संस्थांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.