MPSC News : अखेर राज्यसेवा 2025 ची प्रतिक्षा संपली, 385 जागांसाठी जाहिरात आली

MPSC Rajyaseva 2025 : मागील दोन महिन्यांपासून राजपत्रित पूर्व परीक्षेच्या जाहिरातीची वाट पाहणाऱ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षेच्या जाहिरात प्रसिद्ध केली असून 385 जागांसाठी जाहिरात काढली आहे.
MPSC student Protest.
MPSC student Protest.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या दोन महिन्यांपासून राजपत्रित पूर्व परीक्षा कधी होणार? कधी जाहीरात निघणार असा सवाल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुरू होती. चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात प्रसिद्ध केली असून 385 जागांसाठी काढण्यात आली आहे. ही परीक्षा 28 सप्टेंबरला होणार असून ती राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 2025 च्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा परीक्षेची जाहिरात या आधीच येण्याची शक्यता होती. ही जाहीरात जानेवारी 2025 ला अपेक्षीत असतनाही मार्च आर्धा संपली तरी आली नव्हती. यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुर होता. जाहिरात न आल्याने राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर पडली होती.

पण आता या लाखो विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून मंगळवारी (ता.18) आयोगाने जाहीरात प्रसिद्ध केली आहे. 385 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून राज्यातील लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. मागील दोन महिन्यांपासून आयोगाच्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेची जाहिरात सतत पुढे ढकलत होती. यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

MPSC student Protest.
MPSC Exam : एमपीएससीच्या सर्व परीक्षा आता मराठीतही होणार : देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

अर्ज आणि चालनासाठी कालावधी

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या जाहिरातीनंतर अर्ज 28 मार्च ते 17 एप्रिलपर्यंत करता येणार आहे. अर्जासाठी ऑनलाईन शुल्क 17 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत चालनद्वारे भरता येणार आहे.

MPSC student Protest.
MPSC Success Story : तब्बल 23 वेळी यशाची हुलकावणी, 24 व्या प्रयत्नात MPSC त चमकला

विभागनिहाय जागा

सामान्य प्रशासन विभाग- राज्यसेवा- 127

महसूल व वन विभाग- महाराष्ट्र वनसेवा-144

सार्वजनिक बांधकाम विभाग- स्थापत्य अभियांत्रिकी सेवा- 114

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com