Rajya Sabha election : राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच; रोटेशननुसार जागा ठाकरेंच्या सेनेची असल्याचा दावा

Uddhav Thackeray claim News : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता सध्यस्थितीत महायुतीला सहा मिळतील तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येण्याची शक्यता आहे
Rahul Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray
Rahul Gandhi | Sharad Pawar | Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता सध्यस्थितीत महायुतीला सहा मिळतील तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येण्याची शक्यता आहे. एक जागा निवडून येण्यासाठी 37 आमदारांचे मतदान लागणार आहे. त्यानुसार भाजपला चार जागा मिळतील तर एकनाथ शिंदेच्या वाट्याला एक तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येण्याची शक्यता आहे. त्यातच आता या महाविकास आघाडीच्या येत असलेल्या एका जागेवरून आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत रस्सीखेच पाहवयास मिळत आहे.

राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच असून या एका राज्यसभेच्या जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने राज्यसभा उमेदवारीवरून वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. रोटेशननुसार राज्यसभेची जागा ठाकरे यांच्या सेनेची असल्याचा दावा करत आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मात्र शरद पवार यांच्या नावालाच प्राधान्य दिले आहे.

Rahul Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray
Shiv Sena UBT vs Eknath Shinde : मुंबईचा सौंदर्यभंग की सत्तेचा दुरुपयोग? उपमुख्यमंत्री शिंदेंवर गुन्हा दाखल होणार का? ठाकरेंच्या शिलेदाराचा थेट 'BMC'ला सवाल

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा तोटा होणार आहे. फक्त एका जागेवर त्यांना आपला उमेदवार निवडून आणता येणार आहे. या स्थितीत तीन पक्ष मिळून या एकमेव जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तीन पक्ष राज्यसभेवर कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे.

Rahul Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray
bjp shivsena UBT alliance : महापालिका ‘युतीचा पॅटर्न’ ZPतही! भाजप-ठाकरे समीकरणाने शिंदेंची डोकेदुखी वाढणार?

राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 26 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरवात होईल. त्यानंतर या निवडणुकीसाठीचे चित्र स्पष्ट होणार आहे. महायुतीचे 232 आमदार आणि अपक्षांच्या मदतीने जास्तीत जास्त राज्यसभेचे 6 उमेदवार निवडून येतील तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 20 आणि काँग्रेसचे 16 आमदारांचं संख्याबळ असल्याने महाविकास आघाडीचा फक्त 1 उमेदवार निवडून येऊ शकतो.

Rahul Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray
NCP merger discussion : विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते; रोहित पवारांच्या दाव्यावर दिली त्यांनी मोठी कबुली, म्हणाले...

ही आकडेवारी पहिली तर राज्यसभेत एकच उमेदवार देणे मविआसाठी फायदेशीर आहे. आघाडीतील अंतर्गत वादाचा भाजपला फायदा होऊ नये याची दक्षता विरोधकांनी घ्यायला हवी. तर दुसरीकडे राज्यसभेच्या 7 जागांसाठी 7 उमेदवार दिले तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी राज्यसभेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार? याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.

Rahul Gandhi | Sharad Pawar | Uddhav Thackeray
Congress MLAs Tour : नेतृत्व बदलाच्या वादळात २१ आमदार थेट परदेश दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com