

Pune News : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात माजी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर अडचणीत आल्यानंतर आता शिवसेना (शिंदे गट)च्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासा केले आहेत.
तृप्ती देसाई म्हणाल्या, नीलम गोऱ्हे या ७ ते ८ वर्षांपासून अशोक खरात यांच्या संपर्कात होत्या आणि आमदारकी व मंत्रीपदासाठी भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या भेटी घेत होत्या.
तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या, “नीलम गोऱ्हे या आमदारकी आणि मंत्री पदासाठी अनेक वेळा अशोक खरात यांना भेटायला जात होत्या. नाशिकमधील एक्सप्रेस हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली होती. त्या भविष्य पाहण्यासाठी जात होत्या, विधान परिषद किंवा मंत्री पदासाठी असण्याची शक्यता आहे. या भेटीचे फोटो जरी समोर आले नसले तरी त्यांच्या भेटीदरम्यान ची लोकं त्यांच्यासोबत होती त्यांनी मला ही माहिती दिली आहे.
नीलम गोऱ्हे या नाशिकच्या कॉलेज रोडवरील अशोक खरात यांच्या ऑफिसला भेटायला जात होत्या. ज्या ऑफिसमध्ये अनेक महिलांवर अत्याचार झालेल्या, त्याच ऑफिसला नीलम गोऱ्हे भेटल्या होत्या.”
देसाई यांनी पुढे सांगितले की, अशोक खरात हा राजकीय क्षेत्रात सक्रिय होता. अनेक राजकीय नेते, अधिकारी, मंत्री, आमदार आणि खासदार यांचे नंबर त्याच्याकडे होते. अनेक जण भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधत होते. “नीलम गोऱ्हे या एका जबाबदार पदावर आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्या आहेत. मी एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार करणार आहे.
तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्या चौकशीची मागणी केली आहे. “नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात यांच्यात पैशाची देवाण-घेवाण झाली का, याची SIT ने चौकशी करावी. SIT कडे अनेक माहिती आहे. त्या संदर्भात चौकशी होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, “नीलम गोऱ्हे यांची चौकशी केली पाहिजे. त्यांचे पुरावे समोर आले तर त्या संविधानिक पदावर असल्याने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली.तसेच मी एक जबाबदारीने बोलत आहे. जर माझ्यावर टीका करून हक्कभंगाची नोटीस पाठवली तर मी सर्व पुरावे सादर करेन.” असं तृप्ती देसाई यांनी सांगितले.
दरम्यान गंभीर आरोप झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला होता आता नीलम गोऱ्हे यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.