

Mumbai News: राज्यातील तीन हजार 832 अंगणवाड्यांचे रूपांतर ‘स्मार्ट अंगणवाडी’मध्ये करण्यास महिला व बालकल्याण विभागाने मान्यता दिली आहे. या केंद्रांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य, ई-लर्निंग सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
अंगणवाडी केंद्रांमधून सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या सेवा दिल्या जातात. तसेच गर्भवती महिला आणि स्तनदा मातांनाही पोषण व आरोग्यविषयक सुविधा पुरवल्या जातात. या सेवांचा दर्जा उंचावण्यासोबतच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राबविण्यात येत आहे.
यासाठी शासकीय जागेत असलेल्या आणि विद्युत जोडणी उपलब्ध असलेल्या 3832 अंगणवाडी केंद्रांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, अंगणवाड्यांमधील शैक्षणिक व भौतिक सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे बालकांना सुरुवातीच्या वयातच आधुनिक पद्धतीने शिक्षण घेण्याची संधी मिळण्याबरोबरच पोषण आणि आरोग्य सेवांचाही दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.
या सुविधा मिळणार
स्मार्ट अंगणवाडी किटच्या माध्यमातून या केंद्रांना विविध आधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये ई-लर्निंगसाठी आवश्यक हार्डवेअर व सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी बेसिन, इमारतीची रंगरंगोटी आणि आवश्यक किरकोळ दुरुस्ती यांचा समावेश आहे. याशिवाय पावसाचे पाणी साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि स्वयंपाकघराचे आधुनिकीकरणही करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.