Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेतेपदावर ‘गेम’ सुरू? भास्कर जाधवांच्या आड येणाऱ्या नार्वेकरांवर राऊतांचा हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांनाही इशारा!

Sanjay Raut Scathing Attack on Rahul Narwekar Over Bhaskar Jadhav : विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांविनाच अधिवेशन पार पडणार आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला असून मुख्यमंत्र्यांनाही इशारा दिला आहे.
Opposition leader dispute; Sanjay Raut, Rahul Narwekar And Bhaskar Jadhav
Opposition leader dispute; Sanjay Raut, Rahul Narwekar And Bhaskar Jadhavsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महाविकास आघाडीने भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असल्याचे स्पष्ट झाले.

  2. संजय राऊत यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद न देण्यासाठी कारस्थान केल्याचा आरोप करत सरकारवर टीका केली.

  3. डॉ. आंबेडकर यांच्या राज्यात लोकशाहीची गळचेपी होत असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

Mumbai News : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. मात्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता असणार नसून विरोधी पक्षनेत्याशिवायच हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेत्याची कमतरता असून यावरूच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

महायुतीवर हल्लाबोल करताना त्यांनी, महाविकास आघाडीने भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असतानाही ते नाकारलं जातयं. भास्कर जाधव नको हे ठरवणारे तुम्ही कोण? विधान परिषदेमध्येही विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नाही यासाठी काटकारस्थान आखलं जात असल्याची टीका देखील राऊत यांनी केली आहे. यावेली त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील इशारा दिला आहे. यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच राज्याचे राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

यावेळी राऊत यांनी, ज्या मातीतून डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं त्याच राज्यामध्ये लोकशाहीची अशा पद्धतीने गळचीपी आणि हत्या होत आहे. या घटनेची इतिहासामध्ये नोंद होईल, याचील नोंद राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावी, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. तसेच तुम्ही आज आहात उद्या नाही पण सभागृहाची जी परंपरा आहे ती तुम्ही तोडताय. त्या आसनावर बसून तुम्ही व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत हित जोपासताय हे अनेकदा समोर आल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

Opposition leader dispute; Sanjay Raut, Rahul Narwekar And Bhaskar Jadhav
Sanjay Raut : "मी माफी मागितली नाही" दादा भुसेंनी खटला मागे घेताच संजय राऊतांची कॉलर पुन्हा टाईट ; भाजप आमदारालाही सुनावलं..

दरम्यान राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जी व्यक्ती बसली आहे, त्या व्यक्तीचं पॉलिटिकल कॅरेक्टर काय? त्यांचे कॅरेक्टर पाहता ते निर्णय घेतील का हा पहिला प्रश्न असून तो त्यांनी घेतला तरी नक्की काय असेल याची शंका लोकांना आहे.

विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीबाबत आम्ही एक वर्षापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे, पण हे सरकार आणि मुख्यमंत्री नियमांकडे बोट दाखवत आहेत. ते म्हणतात, तो माझा अधिकार नाही, तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. विधानसभा अध्यक्षही म्हणतात की मी निर्णय घेईन. मात्र जो व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जातो, भानगडी करतो ती व्यक्ती विधानसभा अध्यक्ष आहे. तीच व्यक्ती आता पक्षांतराच्या बाबतीही निर्णय घेणार आहे, असे म्हणत टोला लगावला आहे.

त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाबाबत निर्णय न घेणार्‍या नार्वेकर यांना खडेबोल सुनावले आहेत. राऊत यांनी, जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून संविधानाच्या विरोधात पक्षांतरामध्ये तद्दन खोटा आणि भंपक निर्णय देते त्यांच्याकडे तुम्ही काय अपेक्षा करणार? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांच्याविरोधातच अविश्वास ठरावच आणला पाहिजे असेही त्यांनी म्हटलं आहे. ज्यावर भाजपने पलटावर करताना टीका केली आहे.

Opposition leader dispute; Sanjay Raut, Rahul Narwekar And Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav Opposition Leader : विरोधी पक्षनेतेपदासाठी कोण? आदित्य ठाकरेंची काय आहे भूमिका? भास्कर जाधव म्हणाले, 'सत्ताधाऱ्यांची पाप...'

FAQs :

1. महाविकास आघाडीने कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केले?
भास्कर जाधव यांच्या नावावर विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीने समर्थन दिले आहे.

2. संजय राऊत यांनी कोणता आरोप केला?
विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद न देण्यासाठी कारस्थान केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

3. राऊत यांनी लोकशाहीबाबत काय म्हटले?
राज्यात लोकशाहीची गळचेपी आणि हत्या होत असल्याचे त्यांनी म्हटले.

4. राऊत यांनी कोणाचा संदर्भ दिला?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीचा संदर्भ देत त्यांनी टीका केली.

5. हा वाद कोणत्या पदावरून सुरू आहे?
विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेतेपदावरून हा राजकीय वाद सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com