Pradeep Purnekar Murder Case : मंत्री प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबियांना संताप अनावर : मिनाक्षी शिंदेंवर गंभीर आरोप, पदावरून हकालपट्टीची मागणी

Pratap Sarnaik mees News : ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबरला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Pradeep Purnekar  | Thane Crime Case
Pradeep Purnekar | Thane Crime CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर पहिल्यांदाच मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी मंत्री प्रताप सरनाईकासमोरच पूर्णेकर कुटुंबाने मीनाक्षी शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. त्यासोबतच यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पूर्णेकर कुटुंबियांचे सरनाईक यांनी फोनवर बोलणे करून दिले.

ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबरला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यातच यापूर्वी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची पोलिसानी चौकशी केली.

प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबाची शिवसेनेकडून कोणत्याच बड्या नेत्यांनी भेट घेतली नव्हती. त्यामुळे शनिवारी दुपारी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी प्रदीप पूर्णेकर यांचे भाऊ, पत्नी, चिरंजीव राम यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यावेळी मंत्री प्रताप सरनाईकासमोरच पूर्णेकर कुटुंबाने मीनाक्षी शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या हत्या प्रकरणामागे त्यांचाच हात असल्याचा आरोप केला. त्यामुळे मीनाक्षी शिंदे यांना पदावरून हटवण्याची मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली.

Pradeep Purnekar  | Thane Crime Case
Shivsena News : एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिपदावर नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी, 'त्या' नेत्यांना मिळणार डच्चू ?

त्यासोबतच यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पूर्णेकर कुटुंबियांचे सरनाईक यांनी फोनवर बोलणे करून दिले. यावेळी राम पूर्णेकर यांनी शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Pradeep Purnekar  | Thane Crime Case
Shivsena News : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत; शिवसैनिक म्हणून आणखी एका मंत्र्यांने व्यक्त केली इच्छा

दरम्यान, यापूर्वी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची पोलिसानी मंगळवारी व बुधवारी सलग दोन दिवस सुमारे १७ तास कसून चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी ठाणे पोलिसांनी बोलवले होते. यापूर्वी पोलिसांनी राजेंद्र शिंदे यांची प्रदीप पूर्णेकर यांच्या प्रकरणातील संशयित आरोपींच्या समोरासमोर बसवून चाैकशी केली आहे. त्यामुळे या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com