Uddhav Thackeray Setback : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, तब्बल 12 नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या गळाला? 5 कोटी...

Operation Tiger Eknath Shinde : उद्धव ठाकरेंचे खासदार फोडल्यानंतर आमदार सचिन अहिर यांना देखील एकनाथ शिंदेंनी फोडले. आता ठाकरेंना अजून एक धक्का देत त्यांचे नगरसेवक फोडण्याची तयारी शिंदेंकडून करण्यात आल्याची माहिती आहे.
Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav Thackeray sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Politics : उद्धव ठाकरेंच्या शिवसेना मोठा धक्का देण्याच्या तयारी एकनाथ शिंदे असल्याचे समोर आले आहे. सहा खासदार आणि त्यानंतर आमदार सचिन अहिर यांना फोडल्यानंतर आता ठाकरेंचे नगरसेवक फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याचे समोर आले आहे. या विषयी 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

नाशिक महापालिकेतील ठाकरेंच्या 10 ते 12 नगरसवेकांवर शिंदेंची नजर आहे. यातील अनेक नगरसेवकांची शिंदेंच्या शिवसेनेतीलवरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची चर्चा देखील झाल्याचे सुत्रांच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे. शिंदेंच्या शिवसेनेत आल्यानंतर प्रभागनिहाय त्यांना पाच कोटी निधीचे आश्वासन दिल्याचे देखील सांगितले जात आहे.

नाशिक महापालिकेत भाजपचा महापौर आहे. तर, उपमहापौर पद शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 60 जागा मिळाल्या होत्या. तर, शिंदेंच्या शिवसेनेला 37 जागांवर विजय मिळवता आला होता. तर, ठाकरेंच्या शिवसेनेचे 12 नगरसेवक विजयी झाले होते.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Aditya Thackeray news : आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात; एकनाथ शिंदेंकडून फुलप्रूफ तयारी

संघटन विस्तारासाठी हालचाली

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून संघटन विस्तारासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरेंचे नगरसेवक फोडण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेकडून केली जात आहे. निधीसाठी नगरसेवक आमच्याकडे येणार नाही तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाची भूरळ आहे, असा दावा नाशिकमधील शिंदेंच्या शिवसेनेतील स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे.

Eknath Shinde,  Uddhav Thackeray
Shivsena News : शिवसेनेत जाण्याचा प्लॅन कधी, कसा ठरला? कोणी संपर्क केला? सचिन अहिर यांनी अखेर सगळंच सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com