Mahayuti masterplan : ठाकरे बंधूंना धक्का देणारा महायुतीचा मास्टरप्लॅन; तीन पक्षांचे मिशन ठरले; उमेदवारी देण्यापूर्वी घेणार मोठा निर्णय!

Political News : महायुतीचे टेन्शन वाढले असतानाच आता येत्या काळात ठाकरे बंधूंना धक्का देणारा महायुतीने मास्टरप्लॅन तयार केला असून भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे मिशन ठरले आहे.
Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Mahayuti Politics Local Body Elections 2025Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ठाकरे बंधूंनी ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी मराठीच्या मुद्द्यांवरून एकत्र येताना महायुतीचे टेन्शन वाढवले आहे. शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीमुळे यावेळेस एकसंध शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून गेल्या काही दिवसापासून तयारी सुरु केली आहे. मात्र, येत्या काळात ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर मात्र महायुतीची अडचण होणार आहे.

मुंबई पालिका निवडणुकीत मराठी-अमराठी असे मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले असतानाच आता येत्या काळात ठाकरे बंधूंना धक्का देणारा महायुतीने मास्टरप्लॅन तयार केला असून भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे मिशन ठरले आहे.

येत्या काळात राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. त्यातच सर्वांचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकींकडे लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्षाने आतापसूनच निवडणुकीची तयारी सुरु आहे. मराठीच्या मुद्द्यावरून एकीकडे 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत. पालिका निवडणुकीत देखील ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा आहे.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Raj Thackeray silent game: राज ठाकरेंचा ‘सायलेंट गेम’ : युतीबाबतचे नेमके प्लॅनिंग काय? शिंदेंसोबत वेगळाच डाव खेळणार?

मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने (Mahayuti) देखील कंबर कसली आहे. त्यामुळेच ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीकडून मिशन महापौरची घोषणा करण्यात आली आहे. त्याची तयारी करण्यात येत आहे. मुंबईतील विविध समुदायाची टक्केवारीनुसार महायुतीच्या निवडणुकीचा फॉर्म्युला ठरणार असल्याची शक्यता आहे.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना; नागपुरात अनपेक्षित धक्का...

मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी- अमराठी असे मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यापासून महायुती उमेदवारांसाठी सर्व्हे करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडे (BJP) अमराठी मतांची जबाबदारी असल्याची माहिती आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे मराठी मते वळवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुजन मतांची जबाबदारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Raj-Uddhav Thackeray: सावरलेला डाव राज ठाकरेंच्या 'एन्ट्री'ने पुन्हा विस्कटणार; युतीची खेळी अनेकांचा जाणार बळी !

ठाकरे बंधूनी एकत्र आल्यानंतर मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत राज्य सरकारला काही सवाल केले आहेत. त्यामुळे मराठी आणि अमराठी असा मुद्दा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापण्याची शक्यता आहे. मुंबईत मराठी माणसांची संख्या कमी झाली. तर, अमराठी माणसांची संख्या गेल्या काही दिवसात वाढली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे भाषेच्या मुद्द्यावरच पालिका निवडणुका लढवल्या जाणार असल्याची शक्यता आहे.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
Raj-uddhav Thackeray : तुफान गर्दी जमवली, मराठी मनं जिंकली, एकीचा गुलालही उधळला; पण ठाकरे बंधूंकडून अजूनही युतीचा 'सस्पेन्स' कायम

मुंबई पालिकेतील मतांची टक्केवारी

मुंबईत 32 टक्के मराठी माणसे आहेत.14 टक्के मुस्लिमांची लोकसंख्या आहे. इतर अमराठींची संख्या ही 54 टक्के आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा होता. दरम्यान भाजपला शिवसेनेकडील मुंबई महानगरपालिकेवरची सत्ता काबीज करायची आहे. त्यामुळे महायुतीकडून मुंबई पालिकेसाठी मिशन महापौर राबवण्यात येत आहे.

Mahayuti Politics  Local Body Elections 2025
BJP Politics : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या ठाकरेंना दे धक्का! बालेकिल्ल्यात 'डॅमेज कंट्रोल', विकास म्हात्रेंचे मन वळवले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com