Raj Thackeray silent game: राज ठाकरेंचा ‘सायलेंट गेम’ : युतीबाबतचे नेमके प्लॅनिंग काय? शिंदेंसोबत वेगळाच डाव खेळणार?
Mumbai News : राज ठाकरे यांच्या परवाच्या भाषणातील शांत देहबोली, युतीवर फारसे न केलेल भाष्य, उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत फारसा उत्साह न दाखवणे, भाजपने राज ठाकरे यांच्यावर एकही टीका न करणे, शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिलेले आदेश या सगळ्याचा अर्थ नेमका काय आहे? अशी चर्चा सध्या माध्यमांत रंगली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांचे पत्ते उघड आहेत पण राज ठाकरे यांनी पत्ते ओपन केले नाहीत. राज ठाकरे यांचे कौतुक भाजप आणि शिवसेना शिंदे गट करत आहे, त्यामुळे संभ्रम नक्कीच निर्माण झाला असला तरी यामागे राज ठाकरे यांचे नक्कीच काही तरी प्लॅनींग असावे, असे वाटते.
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यांनी वरळी येथे मोठा मेळावा घेत मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलो असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लवकरच मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) युतीची घोषणा होईल, असे वातावरण आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले असतानाच अद्याप युतीची चर्चा पुढे सरकत नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे युतीबाबत अद्यापही सावध भूमिका घेताना दिसत आहेत.
राज्यात येत्या काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होत आहेत. त्यामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. गेल्या सहा महिन्यापासून ठाकरे गटाचा बाल्लेकिला असलेली मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने (Bjp) मोठी तयारी केली आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू आहे. मराठीच्या मुद्द्यावरून एकीकडे 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीत देखील ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा आहे.
त्यातच आता राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमुळे गोंधळ उडालेला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनीही आपल्या प्रवक्त्याना सांगितले आहे की, राज ठाकरे यांच्याबद्दल काही बोलायचे नाही,आणि आता दोघांचा एकमेकांशी अर्थ आहे का नाही. हे काही कळत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये मात्र संभ्रम पसरला आहे.
मीरा भाईंदर मध्ये लोकांनी उठाव केला होता, लोकांनी आंदोलन हातात घेतले होते, आणि त्याठिकाणी संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर या ठिकाणी व्यवस्थित माध्यमांशी बोलले. पण प्रश्न असा आहे की, माध्यमांशी बोलायचे नाही. हा जो एक प्रकारचा फतवा काढला आहे, यामागचे काय गूढ आहे, हे अजून उलगडलेले नाही.
निशिकांत दुबे यांनी जी गरळ ओकली आणि ते मनसेच्या विरोधात टार्गेट करून होते, तेव्हा मनसेचे अनेक प्रवक्ते अस्वस्थ झाले की, आपण बोलले पाहिजे. त्यांनी संपर्क साधला तर त्यांना कुणी प्रतिसाद दिला नाही. राज ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद न गेल्यामुळे, निशिकांत दुबे यांच्याबद्दल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिली, पण त्यावर राज ठाकरे यांच्या गटाकडून प्रतिक्रिया आली नाही.
मीरा-भाईंदरमधील आंदोलनात मनसेसोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना रणांगणात उतरली. पण प्रश्न असा आहे, या दोन पक्षांनी मिळून काय करायचे आहे. संजय राऊत यांनी मनसेची बाजू उचलून धरली. दोन पक्षाचे जे एकत्रीकरण व्हायला पाहिजे, युती व्हायला पाहिजे, दोन भावांचा एकमेकांशी जो मेळ जमायला पाहिजे, याच्यामध्ये काहीतरी प्रश्न आहे, किंवा काहीतरी शंका आहे,असा वाव घ्यावा किंवा व्यक्त व्हावा असा हा आदेश आहे, तेव्हा मला असे वाटते की, राज ठाकरे यांनी याबद्दल स्पष्टीकरण लवकर दिले तर, ते जास्त योग्य राहील, असा सूर राजकीय वर्तुळात आहे.
राज ठाकरे हे कुठल्या दबावात येणारे व्यक्ती नाहीत आणि त्यांच्यावर दबाव आणणे अशक्य आहे. पण त्यांच्यावर एक मानसिक दडपण आले आहे, त्यांना वाटत असावे आपण योग्य करतो की, अयोग्य करतोय, दोन ठाकरे एकत्र आले,तर कोणत्या ठाकरेचे महत्त्व कमी होईल, लोकांमध्ये तुलना होईल का..? अशा स्वरूपाचे प्रश्न नक्कीच त्यांना सतावत असणार आहेत.
राज ठाकरे कुठलाच निर्णय घेत नसल्याने संभ्रम नक्कीच आहे. मात्र, निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याकडे वेळ असल्याने ते विचारपूर्वक निर्णय घेतील असे वाटते. त्यामुळेच निर्णय घेण्यास उशीर करतील असे वाटते. दुसरीकडे गडबडीत किंवा लवकर त्यांनी युती करण्याचा निर्णय घेतला तर बार्गेनिंग पावर कमी होईल असे वाटते. त्याशिवाय या पूर्वी दोन वेळा युतीचा निर्णय घेत असताना शिवसेनकडून पोळले असल्याने ते सावधपणे पावले उचलत आहेत. दोन्ही पक्षात जागावाटपाबाबतचे बोलणे पूर्ण झाल्याशिवाय ते युतीबाबत अधिकृतरित्या कोणती घोषणा करतील, असे वाटते.
मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची उत्सुकता शिगेला पोहचली असली तरी याबाबतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष येत्या काळात जागावाटपाची बोलणी पूर्ण करूनच निर्णय घेतील, असे सध्या तरी दोन्ही पक्षातील हालचाली पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.