

Mumbai News: भोंदू बाबांमुळे सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे, नाशिक, संगमनेर नंतर आता मुंबईतील भोंदू बाबा चर्चेत आला आहे. आठवड्यातल्या दोन दिवशी म्हणजे रविवार आणि गुरुवार आपल्या अंगात या देवी येते, मी अनेकांच्या अंगातील भूत उतरवतो" असं म्हणत मालाड येथील जादूटोणा करणाऱ्या एका भोंदू बाबाबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केली आहे.
स्थानिक नागरिकांनी या बाबाच्या कारनाम्याने अनेक पुरावे दिंडोशी पोलिसांकडे सूपूर्त केले आहे. या भोंदूवर कडक कारवाई करुन त्याला अटक करावी, अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबबत 65 ते 70 स्थानिकांनी आपल्या सहीचं पत्र पोलिसांना दिले आहे., रिदम पांचाळ असे या भोंदूबाबाचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
नाशिकमधील अशोक खरात याच्या भोंदूगिरीमुळे राज्यातील राजकारण चांगलच ढवळून निघत असताना, राज्यातील अशा अनेक महाराजांच्या भोंदूगिरीच्या दुकानांचा भांडाफोड होताना दिसत आहे. हे पेव रोखण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्यभरात अॅक्टिव्ह झाली आहे.
हा भोंदू बाबा करीत असलेल्या अघोरी विद्येचे काही व्हिडिओ नागरिकांनी काही दिवसापूर्वी पोलिसांकडे दिले आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे ही याबाबतची तक्रार करण्यात आली आहे. अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करा, असे नागरिकांनी म्हणणे आहे.पुजेसाठी वापरत असलेली वस्तूंवर आपण जर नजर टाकली तर हा बाबा नेमकी कुठली पूजा करतो, असा प्रश्न पडतो.
बकऱ्याचा कलेजा, काळे कापड,लाल कापड, स्मशान राख, लिंबू, टाचणी, दारूची बाटली,कुंकू, सिगारेट आदी वस्तूंचा वापर तो पूजेसाठी करीत असतो. ज्या ठिकाणी चार रस्ते मिळतात, अशा ठिकाणी या वस्तू हा भोंदू ठेवत असतो, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अनेक वेळा स्थानिकांनी या भोंदू बाबा आपला कार्यक्रम थांबवल्याचे सांगितले होते, पण त्याने याकडे दुर्लक्ष केले.त्यानंतर स्थानिकांना पोलिसांमध्ये त्याच्याविरोधात तक्रार केली. ही एक प्रकारे देवीची पूजा असल्याचं हा भोंदूबाबा सांगतो.
संगमनेरमधील अशात एका भोंदू बाबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती मैदानात उतरली आहे.दत्तधाम सरकार नावाने साम्राज्य उभं केलेल्या, भक्तांचे आजार दूर करण्याचा दावा करत आर्थिक लूट करणाऱ्या, अंधश्रद्धा पसरवणाऱ्याविरोधात कारवाई करा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.