Manikrao Kokate Viral Video : रम्मी खेळण्याचा व्हिडिओ, माणिकराव कोकाटेंनी स्पष्टच सांगितले, 'मी युट्यूबवर...'

Manikrao Kokate Clarifies Viral Rummy Video : रोहित पवारांनी स्वतःची करमणूक करण्यासाठी हा व्हिडिओ आणला.मी रमी खेळत नव्हतो. रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या हितासंदर्भातील कोणते प्रश्न सभागृहात उपस्थित केले, असा हल्लाबोल माणिकराव कोकाटेंनी केला.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate Vs Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधीमंडळाच्या सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओने एकच खळबळ उडाली होती. विरोधी पक्षांकडून माणिकराव कोकाटेंवर टीका करण्यात येत होती. आता या व्हिडिओवर माणिकराव कोकाटेंनी स्पष्टीकरण दिले आहे.

कोकाटे म्हणाले, 'हा विधान परिषदेमधला व्हिडिओ असावा. सभागृहात सीसीटीव्ही आहेत. सभागृहाचे नियम मला माहीत आहे. त्यामुळे मी असं काही करू शकत नाही. सभागृह स्थगित झाले होते. तेव्हा वरिष्ठ सभागृहात काय चालले आहे हे युट्यूबवर पाहण्यासाठी मी फोन सुरू केला होता. तेव्हा जंगली रम्मीची जाहीरात समोर आली. मी लगेच ती स्कीप करत होतो. त्यावेळचा तो व्हिडिओ आहे. 10 ते 12 सेकंदांचा तो व्हिडिओ आहे. जाहीरात स्कीप होत नव्हती तेव्हा मी दोन तीनवेळा प्रयत्न केला. आणि जाहीरात स्कीप केली.'

'तो व्हिडिओ उपलब्ध करा आणि पाहा की मी जाहीरात स्कीप करत होतो. रोहित पवारांनी स्वतःची करमणूक करण्यासाठी हा व्हिडिओ आणला.मी रमी खेळत नव्हतो. रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या हितासंदर्भातील कोणते प्रश्न सभागृहात उपस्थित केले. आम्ही शेतकऱ्यांसाठी गावोगावी फिरतो, विभागात फिरतो. नवेआदेश देतो. त्यांना आमचे काम दिसत नाही. त्यांच्या या नवीन उद्योगाने काही होत नाही जनता याला बळी पडणारी नाही', असा टोला देखील कोकाटे यांनी रोहित पवारांना लगावला.

Manikrao Kokate
Shashikant Shinde : पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होताच शशिकांत शिंदेंनी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी केली ही प्रार्थना!

'भांडवल कशाचे करावे कशाचे करू नये हे त्यांना कळलं पाहिजे. रमी खेळत होता हा खोटा आरोप आहे. सभागृहात सीसीटीव्ही असतात मला नियम माहीत आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. जर रोहित पवारांनी युट्यूब उघडले तर त्यावर सुद्धा जंगली रमीची जाहिरात येईल. गाण्याची जाहिरात येईल.', असे देखील कोकाटेंनी सांगितले.

Manikrao Kokate
Thackeray BJP meeting : ठाकरे-फडणवीसांच्या भेटी शिंदेंच्या शिवसेनेला झोंबतेय; सरनाईकांनी पळ काढणारे अन् संधीसाधू म्हणत डिवचले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com