Eknath Shinde News: जरांगेंकडून '500 कोटींचा खळबळजनक आरोप, दसरा मेळाव्यात चकार शब्द नाही, एकनाथ शिंदेंचं थेट दिल्लीतूनच मोठं विधान

Shivsena Politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींच्या आरोपांवर आमचे प्रवक्ते, नेते बोलताहेत. कुणाला 500 कोटी दिलेही नाही आणि घेतलेही नाही. ते देण्याचा प्रश्नही नाही. बरं, या ज्याकाही आधारावर जरांगे पाटील हे बोलताहेत, त्याची अगोदर शहानिशा त्यांनी करायला पाहिजे होती. शहानिशा करुनच त्यांनी बोलायला पाहिजे होतं असंही त्यांनी म्हटलं.
Manoj Jarange Patil And Eknath Shinde
Manoj Jarange Patil And Eknath Shindesarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील त्यांच्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर यांच्याबाबत खळबळजनक आरोप केला. त्यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदेंना थेट विचारलं की, "माझं नाव सांगून तुम्ही दिल्लीतून भाजपच्या लोकांकडून 500 कोटी रुपये आणले आहेत का?" आणि "हे पैसे मला दिलेत असं तुम्ही त्यांना सांगितलंय का? या धक्कादायक दाव्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणामध्ये याबाबत बोलावं, त्यांनी हा मुद्दा स्पष्ट करावा असं आव्हानही दिलं होतं. मात्र, दसरा मेळाव्यात शिंदेंनी जरांगेंच्या आरोपांना अजिबात उत्तर दिलं नव्हतं. परंतू, एकनाथ शिंदेंनी थेट राजधानी दिल्लीतून जरांगे पाटलांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी(ता.21)दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्री व काही महायुतीमधील राजकीय नेतेमंडळींसह राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेतली. यावेळी महायुती सरकारच्या वतीनं राष्ट्रपतींना कुंभमेळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी जरांगे पाटलांचे 500 कोटींचे आरोप,संजय राऊत आणि विरोधकांवर निशाणा साधला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींच्या आरोपांवर आमचे प्रवक्ते, नेते बोलताहेत. कुणाला 500 कोटी दिलेही नाही आणि घेतलेही नाही. ते देण्याचा प्रश्नही नाही. बरं, या ज्याकाही आधारावर जरांगे पाटील हे बोलताहेत, त्याची अगोदर शहानिशा त्यांनी करायला पाहिजे होती. शहानिशा करुनच त्यांनी बोलायला पाहिजे होतं असंही त्यांनी म्हटलं.

तसेच मनोज जरांगे यांच्याकडे 500 कोटींच्या जे काही पुरावे असतील, तेही त्यांनी संबंधित यंत्रणांकडे द्यावेत. त्याची चौकशी झाली पाहिजे. दुध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. एवढंच याप्रसंगी मी सांगतो. एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र,तसेच संपूर्ण देश ओळखतो,असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

Manoj Jarange Patil And Eknath Shinde
Kolhapur Circuit Bench: कोल्हापुरात भाजपच्या नगरसेवकला दिलासा, विजय देसाई यांचे जातवैधता प्रमाणपत्र उच्च न्यायल्याकडून वैध

माझ्या कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे.त्यामुळे एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं की,हेडलाईन होते. म्हणूनच बरेच लोक नावं घेतात. मनोज जरांगे हे मराठा समाजाचं काम करताहेत.मराठा समाजाचं काम त्यांनी केलं पाहिजे. ते समाजाचं काम करत होते, म्हणूनच मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं. कुणबी प्रमाणपत्र असतील, आरक्षण असेल,५३०० लोकांना असंख्य पदावर नोकरी दिल्याची आठवणही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना करुन दिली.

शिंदे म्हणाले, आम्ही साठ वर्षांत मराठा समाजाचे जे वरिष्ठ नेते,जे कर्ते होते, तरी ते करू शकले नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना केले,देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण देण्यास सुरुवात केली.आजही ते आरक्षण टिकलेलं आहे. ओबीसी, इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता, कुणाचंही काढून न घेता फक्त मराठा समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही केलं आहे. आणि मराठा समाजाचंच काम मनोज जरांगे करत होते. म्हणून आम्ही त्यांना मदत केली. परंतू,त्यांनी समाजाचं काम करावं.राजकीय त्याचा प्लॅटफॉर्म त्यांनी बनू नये असा खोचक सल्लाही एकनाथ शिंदेंनी जरांगेंना दिला.

Manoj Jarange Patil And Eknath Shinde
Manoj Jarange: जरांगे आता थेट भिडणार? एकनाथ शिंदेंवर पुन्हा केले गंभीर आरोप; 500 कोटींच्या आरोपांचे पुरावे देणार

संजय राऊतांच्या अमित शाह लॉरेन्स बिश्नोई आहेत असा गंभीर आरोप केला होता. त्यावर शिंदेंनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह हे आहेत. त्यांच्यावर टीका केली की, तुम्ही त्याची हेडलाईन करता.आता त्यांना काही कामधंदा उरलाय का? कुणाच्याही गर्दीत जाऊन घुसायचं,माईक हिसकावून घ्यायचा. भाषण ठोकायचं. आता त्यांच्याकडे गर्दी नाही,माणसंही नसल्याचा टोलाही शिंदेंनी यावेळी उद्धव ठाकरे,त्यांची शिवसेना आणि संजय राऊतांना लगावला.

एकनाथ शिंदे म्हणाले, दुसर्‍याच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तिसर्‍यावर आरोप करायचे,ते पण बेछूट आरोप करायचे. ज्या प्रधानमंत्र्यांनी देशाला पुढे नेलं. ज्या गृहमंत्र्यांनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली 370 कलम हटवलं. ते स्वप्नवत वाटत होतं. त्यांना तुम्ही रोज शिव्या देता.ही काय टीकेची पातळी आहे, असा म्हणून मी एवढंच सांगतो,यांचा करावा तेवढा निषेध कमी असल्यांही त्यांनी सांगितलं.

Manoj Jarange Patil And Eknath Shinde
Gokul Election Result : "सतेज पाटील फेक नरेटिव्ह पसरवण्यात यशस्वी"; गोकुळमध्ये भाजपचा सुपडासाफ झाल्यानंतर धनंजय महाडिकांची पहिली प्रतिक्रिया

तसेच रेजीम चेंज करणार, हे करणार ते करणार, अरे, तुम्ही कोण चेंज करणारे, ही जनता ठरवते कुणाला सत्तेत बसवायचं, कुणाला सत्तेतून खाली खेचायचं. तुम्हाला तर जनतेनं तीनदा रिजेक्ट करुन उखडून फेकलं आहे, असं जोरदार प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी काँग्रेस,उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि विरोधकांना दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com